विधानसभा निवडणुका संपताच तेलाच्या किमती 15 रुपयांनी वाढणार, कारण..

'अशा' परिस्थितीत देशांतर्गत तेल कंपन्या डिझेल आणि पेट्रोलचे दर प्रति लिटर 15 रुपयांनी वाढवू शकतात
petrol diesel prices may increase
petrol diesel prices may increaseDainik Gomantak
Published on
Updated on

रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा (रशिया-युक्रेन युद्ध) चटका तुमच्या खिशालाही बसणार आहे. रशिया-युक्रेन तणावामुळे गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमती वाढत होत्या आणि गुरुवारी रशियाने युक्रेनवर हल्ला करताच कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 103 डॉलरवर पोहोचल्या. गेल्या अडीच महिन्यांत कच्च्या तेलाच्या किमती 27 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

या अडीच महिन्यांत सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केलेली नाही. अशा परिस्थितीत आता उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका संपताच तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता बळावली आहे. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 103 डॉलरवर पोहोचली आहे. यापूर्वी 2014 मध्ये कच्च्या तेलाची किंमत 100 डॉलरच्या वर गेली होती.

petrol diesel prices may increase
पंचायत निवडणुकांबाबत प्रश्नचिन्ह? गोवा फॉरवर्डकडून निवडणूक आयुक्तांना पत्र

दर इतके वाढू शकतात

3 नोव्हेंबरपासून देशांतर्गत तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या (petrol) दरात कोणताही बदल केलेला नाही. पण तेव्हापासून कच्चे तेल प्रति बॅरल 20 डॉलर पेक्षा महाग झाले आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की जर रशिया-युक्रेन युद्ध दीर्घकाळ चालले तर कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 120 डॉलर पर्यंत जाऊ शकते.

अशा परिस्थितीत देशांतर्गत तेल कंपन्या डिझेल आणि पेट्रोलचे दर प्रति लिटर 15 रुपयांनी वाढवू शकतात. ही वाढ एकाच वेळी न करता दोन-तीन टप्प्यांत केली जाण्याची शक्यता आहे. नैसर्गिक वायूच्या किमतीही वाढत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत एलपीजी आणि सीएनजीच्या दरातही 10 ते 15 रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

petrol diesel prices may increase
न्यायालयाने आम्हाला न्याय दिला; बाबू कवळेकर

किंमत कधी वाढेल

उत्तर प्रदेश आणि पंजाबसह 5 राज्यांमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांनंतर (Assembly Election) तेल कंपन्या दर वाढवतील, असे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 10 मार्च रोजी विधानसभा निवडणुकीचे निकाल लागणार आहेत. निवडणुकीच्या काळात तेल कंपन्या पेट्रोल-डिझेलचे दर वाढवत नाहीत, असे चित्र सर्वसाधारणपणे पाहायला मिळते. भाव वाढल्याने सरकारचे राजकीय नुकसान होते.

3 नोव्हेंबर रोजी सरकारने कर कमी केला होता

केंद्र सरकारने (Central Government) 3 नोव्हेंबर रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील (diesel) उत्पादन शुल्कात कपात केली होती. यानंतर अनेक राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील करही कमी केला. त्यामुळे दर कमी झाले. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झालेली नाही. तेव्हापासून कच्च्या तेलात लक्षणीय वाढ झाली आहे. 3 नोव्हेंबर 2021 रोजी कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 80 डॉलर होती, जी आता प्रति बॅरल 103 डॉलरच्या वर पोहोचली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com