Goa Election News Updates  Dainik Gomantak
गोवा

Goa Election: 'काँग्रेससाठी काम केल्यानेच विरोधकांकडून माझे अपहरण झाले'

सुधीर कांदोळकर यांचा कार्यकर्ता सिकंदर सवार यांचा दावा

दैनिक गोमन्तक

म्हापसा: म्हापशात काँग्रेस पक्षासाठी कार्य केल्यानेच निवडणुकीच्या आदल्या दिवशी रात्री विरोधकांकडून माझे अपहरण झाले, असा दावा काँग्रेसचे म्हापशातील उमेदवार सुधीर कांदोळकर यांचे समर्थक सिकंदर सवार यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या आदल्या दिवशी अर्थात 13 रोजी रात्रीच्या सुमारास आपले कुणी तरी अपहरण केल्याची तक्रार गंगानगर, खोर्ली-म्हापसा येथील काँग्रेसचे कार्यकर्ता सिकंदर सवार यांनी म्हापसा पोलिस स्थानकात केली आहे. यासंदर्भात आश्चर्याची बाब म्हणजे ती घटना घडल्यानंतर यासंदर्भातील तक्रार सुमारे दहा दिवसांनंतर अर्थात 24 रोजी त्यांनी केलेली आहे.

या तक्रारीत त्यांनी नमूद केले आहे, की 13 रोजी मी मोटारसायकलने लोबोवाडा पर्रा येथे मायकल लोबो यांच्या घरी गेलो होतो. सायंकाळी 5.30 च्या सुमारास मी लोबो यांच्या निवासस्थानाहून मोटारसायकलवरून बस्तोड्याच्या दिशेने जात असताना 6 च्या सुमारास एका कारमधून आलेले दोन पुरुष माझ्यासमोर थांबले व त्यांनी मला त्या कारगाडीत बसण्यास बजावले. त्यानंतर त्यांनी मला पर्वरी येथील केटीसी डेपोच्या परिसरात नेले व तिथे पोहोचल्यानंतर त्या दोघांनी मला दुसऱ्या एका कारमध्ये बसण्यास बजावले. त्या कारमधील व्यक्तींनी मोठे मास्क परिधान केले होते. (Goa Election News Updates)

त्यांनी नंतर माझ्या चेहऱ्यावरही मोठे मास्क घातले व मला सुमारे दोन तास प्रवास करीत कुठेतरी नेले. त्यानंतर त्यांनी मला कुठल्या तरी डोंगराळ भागातील एका रूममध्ये नेऊन जेवणही दिले. तसेच मला अन्य सोयीसुविधाही पुरवल्या. या प्रवावासादरम्यान त्यापैकी एकाने स्वत:चा फोन मला दिला व त्यावर बोलण्यास सांगितले. त्या फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने मला गंभीर परिणामांची धमकी दिली.

यासंदर्भात माहिती देताना सिकंदर सवार म्हणाले, ते सर्वजण कोण होते याची मला कल्पनाच नाही. १४ रोजी रात्री मला त्यांनी पर्वरी भागात सोडून दिले. त्यानंतर मी माझ्या मोबाइलवरून माझा पुत्र समीर यांच्याशी मोबाइल फोनवर संपर्क साधला व मी नेमका कुठे आहे हे मी त्याला सांगितले. त्यानंतर तिथे पोलिस आले व मला म्हापसा पोलिस स्थानकात नेण्यात आले. तसेच पोलिसांनी माझी मोटारसायकलही आणली

अपहरणकर्त्यांच्या भयाने मला काही गोष्टी मनाविरोधात कराव्या लागल्या असे नमूद करून सिकंदर सवार म्हणाले, त्या अज्ञात व्यक्तींनी माझ्या हातांत पैसे देऊन माझी छायाचित्रे घेतली होती. ‘तुमारा नाम अब पुरी म्हापसा मे खराब करेंगे तुमने पसे लिया बोलके’ असे त्यांनी त्या वेळी म्हटले होते. असे असले तरी ती घटना घडली तेव्हा कुणीही मला मारहाण केली नाही

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'भाजप-मगोप युती विरोधकांना क्लिन स्वीप करेल, राज्यात यापुढे तिहेरी इंजिन कार्यरत होईल'! CM सावंतांनी व्यक्त केला विश्वास

Amulya Vessel: भारतीय तटरक्षक दलाच्या ‘अमूल्य’चे जलावतरण! किनारपट्टींची सुरक्षा होणार मजबूत, Watch Video

Goa Winter: धुक्यात हरवला गोवा! हुडहुडी वाढली; पुढचे 2 दिवस कसे राहणार हवामान? वाचा..

Goa Politics: खरी कुजबुज; मेस्सी गोव्यात आला असता तर !

Manik Elephant: 'माणिक हत्ती' 1200 किमी प्रवास करून 'वनतारा'त जाऊ शकेल का? गोवा खंडपीठाचे शारीरिक क्षमता तपासण्याचे आदेश Video

SCROLL FOR NEXT