Goa Congress Party News | Goa Election 2022 latest News
Goa Congress Party News | Goa Election 2022 latest News Dainik Gomantak
गोवा

Goa Election 2022: 'काँग्रेस उमेदवारांची पळवापळवी रोखणार'

दैनिक गोमन्तक

मडगाव: मागच्या निवडणुकीच्या वेळी जनतेचा कौल काँग्रेसच्या बाजूने असतानाही भाजपने सत्ता पळविली. त्यामुळे यावेळी काँग्रेसने पूर्ण काळजी घ्यायची ठरविली असून काँग्रेसच्या आमदारांना फोडून नेले जाऊ नये यासाठी त्यांना एकत्रितच ठेवण्याचे निश्‍चित केले आहे.

आज सोमवारी काँग्रेसच्या दक्षिण गोवा जिल्हा कार्यालयात झालेल्या बैठकीत पक्षाचे केंद्रीय निरीक्षक पी.चिदंबरम यांनी उमेदवारांना याची कल्पना दिली. त्यांना कुठे ठेवणार हे अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, उत्तर गोव्यातील एका हॉटेलात त्यांना ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे. (Goa Election 2022 latest News)

काँग्रेसचे प्रदेशध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chondankar) यांना याबद्दल विचारले असता, सर्व काँग्रेस उमेदवारांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे हे त्यांनी मान्य केले. आमचे कुणी आमदार फुटणार याची भिती आम्हाला वाटत नाही. मात्र, सगळे एकत्र राहिल्यास पुढचे सगळे निर्णय विनाविलंब घेता येणे शक्य होणार यासाठी ही तजवीज केली आहे असे त्यांनी सांगितले.

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांचा 8 मार्च रोजी वाढदिवस असून त्यांनी सर्व काँग्रेस उमेदवारांना पार्टी ठेवली आहे. या पार्टीतच या उमेदवारांचे राहण्याचे ठिकाण कोणते हे त्यांना कळविण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. आज मडगावात दक्षिण गोव्यातील उमेदवारांबरोबर झालेल्या बैठकीला दिनेश गुंडू राव हेही होते.

चोडणकर यांनी काँग्रेसचे आमदार फुटण्याची भीती नाही असे जरी सांगितले असले तरी यापूर्वी भाजपच्या काही स्थानिक नेत्यांनी जिंकू शकतात अशा काँग्रेस उमेदवारांशी संपर्क साधून त्यांना आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न केला होता. मुख्यमंत्री प्रमोद सावंत, आणि मंत्री विश्वजित राणे व माविन गुदिन्हो काँग्रेस उमेदवारांना फोडू पाहतात असा आरोप यापूर्वी खुद्द चोडणकर यांनीच केला होता. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने हा खबरदारीचा उपाय घेण्याचे ठरविले आहे असे समजते.

आप भाजप बरोबर जाणार नाही

दरम्यान रविवारी आपने गोव्याच्या प्रभारी आतिशी मार्लेना यांच्या उपस्थितीत उमेदवारांची बैठक मडगाव येथील नानुटेल हॉटेलमध्ये घेतली. यावेळी काहीही झाले तरी भाजपबरोबर जायचे नाही हा निर्णय घेतल्याचे समजते. अमित पालेकर, व्हेंझी व्हिएगस, प्रतिमा कुतीन्हो, एलिना सालधाना, महादेव नाईक, प्रशांत नाईक, डॉमनिक गावकर, क्रूझ सिल्वा, विश्वजीत राणे व रामराव वाघ हे 10 उमेदवार चांगली कामगिरी करू शकतात असा आपला अंदाज आहे.

आमचे सर्व उमेदवार एकत्र राहावेत असे उमेदवारांनाच वाटत आहे. काँग्रेसच्या सर्व उमेदवारांनी एकत्र राहून भाजपला फोडाफोडीची संधी देऊ नये अशी तमाम जनतेची मागणी आहे. मागच्या दाराने सरकार करण्याची संधी आम्ही यावेळी भाजपला देणार नाहीत

- गिरीश चोडणकर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Live Update: मंडूर येथे भिंत कोसळल्याने माय लेक ठार!

Nilesh Cabral: निलेश काब्राल यांचा थेट CM पदावरच डोळा?; मंत्रिमंडळ फेररचनेच्या पार्श्वभूमीवर मोठे विधान

Goa Rain Update: राज्यात पावसाचा हाहाकार! कुशावती नदीची पातळी वाढली; पारोडा रस्ता दुसऱ्या दिवशीही पाण्याखाली

Mumbai Goa Highway: निवारा शेडविना प्रवाशांचे हाल; पेडणे तालुक्याची समस्या

Goa Red Alert: गोव्यात आज 'रेड' तर उद्या 'ऑरेंज अलर्ट', 2-3 तासात मुसळधार पाऊस; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT