cm pramod sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Goa Loksabha 2024: आता निवडणुकीनंतर इंडिया आघाडी सगळे विसरून जाणार आहे. आपचे तर प्रमुख तुरुंगात आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Loksabha 2024

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी ४ जून रोजी होण्याआधीच कॉंग्रेसने उत्तर व दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात पराभव मान्य केला आहे. खासगीत बोलताना ते हा पराभव मान्य करत आहेत, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला. समाज माध्यमांवर जरा नजर मारली तरी कॉंग्रेसने हा पराभव कसा मान्य केला आहे, हे लक्षात येते असे ते म्हणाले.

भाजप लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकेल, असा दावा मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी केला. उत्तर गोव्यातून श्रीपाद नाईक लाखाच्या मताधिक्याने तर दक्षिण गोव्यातून पल्लवी धेपे या ५०-६० हजाराच्या मताधिक्याने जिंकतील असा पुनरूच्चार त्यांनी केला.

मुख्यमंत्री म्हणाले, काँग्रेसवाल्यांनी मान्य केले आहे, की भाजप गोव्यातील दोन्ही जागा जिंकणार आहे. त्यांनी खासगीत बोलताना तुम्ही दोन्ही जागा जिंकणार असे सांगितले आहे. समाज माध्यमांवर काँग्रेस समर्थकांनी कॉंग्रेस आता चार मतदारसंघापुरतीच मर्यादीत झाल्याचे म्हटले आहे.

कॉंग्रेसपेक्षा प्रचारात काँग्रेसचे घटक पक्ष आक्रमक होते असेही निरीक्षण कॉंग्रेस समर्थकांनीच नोंदवलेले आहे. तेच भांडणे करण्यासाठीही पुढे होते. त्यांनी आम्हीच मूळचे काँग्रेसवाले असेही याखेपेला दाखवून दिले आहे. ते कोण ते मी सांगत नाही.

आता निवडणुकीनंतर इंडिया आघाडी सगळे विसरून जाणार आहे. आपचे तर प्रमुख तुरुंगात आहेत. काँग्रेसने ही निवडणूक धर्माच्या जातीच्या आधारे राजकारण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे व केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक होते.

मतदान उत्सव जणू लग्न सोहळाच

जनतेचे आभार मानतो. मंगळवारी प्रचंड उकाडा असतानाही त्यांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केले. आता प्रत्यक्षातील उष्मा आणि राजकीय उष्माही कमी होत जाईल. अनेक ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या प्रकृतीच्या अस्वास्थ्याकडे दुर्लक्ष करून मतदान केले.

काहीजण मतदानासाठीच अंथरूण सोडून घराबाहेर पडले होते. निवडणूक यंत्रणेने चांगली जनजागृती केल्याने तसेच राजकीय पक्षांनीही प्रत्येक मतदारांपर्यंत पोचण्याचे प्रयत्न केल्याने मतदानाचे अनेकांनी आपले कर्तव्य मानले.

निसर्गपूरक तसेच गुलाबी मतदान केंद्रे या संकल्पनाही जनतेला भावल्या. आमोणेतील पर्यावरण स्नेही मतदान केंद्र अनेकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. मतदान हा मतदानोत्सव होता.

एखाद्या लग्न सोहळ्याला गेल्यानंतर स्वागत केले जाते, शीतपेय दिले जाते, अगदी तसेच वातावरण मतदान केंद्रांवर होते. हे सारे शक्य होण्यासाठी दोन तीन दिवस राबणाऱ्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Karnataka Water Dispute: गोमंतकीयांचा पाण्याचा हक्क धोक्यात? म्हादईनंतर आता तिळारीवर नजर; गोव्याच्या पाण्यावर कर्नाटकच्या नव्या दाव्याची चाहूल

Rohit Sharma Retirement: रोहित शर्मा निवृत्त होणार? BCCI उपाध्यक्ष राजीव शुक्लांनी अफवांवर दिलं स्पष्ट उत्तर; 'हिटमॅन'बाबतचा संभ्रम दूर

Sonia Gandhi on Students Protest: 'विद्यार्थ्यांना शत्रू मानतं मोदी सरकार'! 'नीट' पेपरफुटीवरुन सोनिया गांधींचा हल्लाबोल

Pakistan Suicide Attack: पाकिस्तान पुन्हा रक्ताळला! खैबर पख्तूनख्वामध्ये भीषण आत्मघाती हल्ला; 12 सैनिकांसह 15 जण ठार 

Horoscope: एकादशीचा शुभ मुहूर्त! 'या' राशींचे नशीब उजळणार; आर्थिक लाभासह करिअरमध्ये यशाचे संकेत

SCROLL FOR NEXT