Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: दक्षिणेत चुरस वाढली!

Goa Politics: भाजपला उत्तर गोव्यातही लोकसभा निवडणूक लढवणे होणार कठीण; यावेळी मतविभागणीचा फटका नाही

दैनिक गोमन्तक

Goa Politics: भारतीय राष्ट्रीय विकासात्मक समावेशी गठबंधनमध्ये पुढे येऊन कॉंग्रेस व आम आदमी पक्षाने गोव्यातही युती करून येथील दोन्ही जागा कॉंग्रेसला बहाल करण्याचे अभूतपूर्व पाऊल उचलल्यामुळे येथे मताधिक्य प्राप्त करण्याचे सत्ताधारी पक्षाचे स्वप्न भंगले आहे.

दक्षिणेतच नव्हे, तर उत्तर गोव्यातही भाजपला विजयी होण्यासाठी आता प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, अशी चर्चा खुद्द सत्ताधारी पक्षात सुरू झाली आहे.

‘‘दक्षिण गोव्यातील जागा सहज पदरात पाडून घेणे आता भाजपला शक्य नाही. कारण कॉंग्रेस व सहकारी पक्षाकडे तेथे 45 टक्के मते आहेत. उत्तर गोव्यातही कॉंग्रेस पक्षाकडे अंदाजे एक लाखाहून अधिक मते आहेत. या युतीमुळे कॉंग्रेस उमेदवाराचे प्राबल्य निश्‍चितच वाढेल’’, अशी प्रतिक्रिया देऊन भाजपचा एक नेता म्हणाला की, ‘‘दोन्ही जागांवर आता चुरस वाढेल, अशी कल्पना भाजप संघटनेला आली आहे.’’

‘‘कॉंग्रेस - आप युतीमुळे निवडणुकीची रंगत वाढली, त्यामुळे ही निवडणूक आता एकतर्फी होणार नाही’’, असे भाजपच्या एका मंत्र्याने ‘गोमन्तक’ला सांगितले. या नव्या घडामोडीमुळे भाजपने सावध होऊन नव्याने मोर्चेबांधणी करण्यासाठी आपसांत बोलणी सुरू केली आहे. दक्षिणेतील उमेदवाराबाबत आता त्यांना आणखी चोखंदळ बनावे लागेल.

दक्षिणेतून दिगंबर कामत आणि रमेश तवडकर यांनी माघार घेतल्यामुळे पक्षश्रेष्ठींनी त्यांचा विचार करणे सोडून दिले आहे. दिगंबर कामत यांच्याकडे त्यांची स्वत:ची मते आहेत. ‘‘दिगंबर कामत यांनाच लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा नसल्याने पक्ष त्यांच्यावर हे ओझे टाकू इच्छित नाही’’,

अशी माहिती एका ज्येष्ठ नेत्याने ‘गोमन्तक’ला दिली. त्यामुळे उमेदवारीच्या स्पर्धेत आता ॲड. नरेंद्र सावईकर, बाबू कवळेकर आणि दामू नाईक असे तीन उमेदवार राहिले आहेत.

गेल्या आठवड्यात पक्षांतर्गत सर्वेक्षणामध्ये दक्षिण गोव्यासाठी कार्यकर्त्यांनी ॲड. नरेंद्र सावईकरांना पसंती दिली होती; परंतु उमेदवाराची निवड करताना आता कॉंग्रेस-आप युतीमुळे बदललेली स्थिती आणि जातीनिहाय मतदारसंख्या या बाबींवरही लक्ष द्यावे लागणार आहे.

पक्षाचे निष्ठावान मतदार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कल या गोष्टींचाही उमेदवार निवडीवर परिणाम होत असतो. उत्तर गोव्यातही उमेदवारांबाबत पक्षांतर्गत सर्वेक्षण करण्यात आले असून तेथे श्रीपाद नाईक यांना पक्षाची पसंती असल्याची माहिती मिळाली.

रमाकांत खलपांचे पारडे जड

उत्तर गोव्यात कॉंग्रेस पक्षातर्फे ॲड. रमाकांत खलप यांना उमेदवारी मिळणार, हे स्पष्ट होऊ लागले आहे. गेल्या निवडणुकीत उत्तरेत कॉंग्रेसने दक्षिणेत वास्तव्य करणाऱ्या गिरीश चोडणकर यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी त्यांना ३८-४० टक्के म्हणजे एक लाख ६४ हजार मते मिळाली होती. उत्तर गोव्यात जरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गारूड राहणार असले, तरी भाजपला प्रस्थापित विरोधी मतदानाचा फटका बसू शकतो.

‘आरजी’ची जादू कुचकामी ठरणार

सूत्रांच्या मते, भाजपने संघटनात्मकरित्या गोव्यातील दोन्ही जागांचा अभ्यास केला असून कॉंग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखालील आघाडीची मते विभागून जाण्याची स्थिती यावेळी राहणार नाही, या निष्कर्षावर ते आले आहेत. या निकषानुसार, ‘रेव्होल्युशनरी गोवन्स’ हा पक्ष कॉंग्रेसचा ‘खेळ बिघडवणारा घटक’ ठरू शकणार नाही. विधानसभेत ‘आरजी’च्या अस्तित्वामुळे भाजपला अनेक जागा जिंकता आल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Sand Mining: सावर्डे सत्तरीत बेकायदेशीर रेती उत्खनन; एका महिलेचा म्हादईत बुडून मृत्यू

Goa Crime: तिसवाडीत 15 वर्षीय मुलीचे अपहरण, ओडिशातील तरुणाविरोधात गुन्हा नोंद; पोलिस तपास सुरु!

Tuberculosis: क्षय रोगाला हद्दपार करण्यासाठी मिळाले स्टार बूस्ट!! वर्षा उसगावकर आणि जॉन डी सिल्वा गोव्याचे 'टीबी ब्रँड ॲम्बेसेडर'

Mormugao Port: गोव्यात क्रूझ पर्यटन हंगाम सुरू; एकाच दिवशी कॉर्डेलिया आणि जर्मनीहून जहाजं दाखल

Goa Agriculture: गोव्यात यंदा पोफळीच्या लागवडीत 18 हेक्टरने वाढ! सत्तरीत सर्वाधिक लागवड

SCROLL FOR NEXT