In Goa, a man committed suicide due to a Mining closure Dainik Gomantak
गोवा

गोव्यात खाण काम बंदीचा एक बळी

आत्महत्येपूर्वी लिहली चिठ्ठी

दैनिक गोमन्तक

करमले-कुडणे येथील रमेश नाईक या 54 वर्षीय व्यक्तीने गुरुवारी सकाळी पाणी साचलेल्या खाणीच्या खंदकात उडी टाकून आत्महत्या केली आहे. त्याचा मृतदेह आज सापडला आहे. खाण बंदीमुळे काम नसल्यामुळे आत्महत्या (Suicide) केल्याचे त्याने चिठ्ठीत नमूद केले होते. त्याच्या आत्महत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, गोव्यात खाणकाम (Mining) व्यवसायामुळे राजकारण चांगलेच तापलेले आहे. 2022 च्या निवडणुकीत हा मुद्दा विरोधकांनी चांगलाच लावून धरला होता. त्यामुळे सत्ताधारी भाजपने (BJP) राज्यात लवकरचंं कायदेशीर खाणकाम व्यवसाय सुरू करण्याचे आश्वासन देखील जनतेला दिले होते. मात्र अद्यापही खाणकाम व्यवसाय सुरू झालेला नाही. त्यामुळे आता प्रशासन याकडे गांभीर्याने पाहणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

In Goa, a man committed suicide due to a Mining closure

जिल्हा दंडाधिकारी, उत्तर गोवा यांच्या विनंतीच्या आधारे, करमले, कुडणे येथे खाण पिटात बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यात मदत करण्यासाठी नौदल डायव्हिंग टीम तैनात करण्यात आली होती. या व्यक्तीचा मृतदेह नौदल जवानांनी बाहेर काढून पुढील कार्यवाहीसाठी सिव्हिल पोलिसांच्या ताब्यात दिला.

करमले-कुडणे येथील रमेश नाईक या 44 वर्षीय व्यक्तीने शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास खाण पिटात उडी मारून आत्महत्या केली. खाण बंदीमुळे आत्महत्या करीत आहे. याबाबत कुटुंबीयांना जबाबदार धरू नये असा उल्लेख त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत केला आहे. नाईक हे पूर्वी साळगावकरकंपनीत कामाला होते. सायंकाळी चारच्या सुमारास नौदलाच्या जवानांनी त्यांचा मृतदेह शोधून काढला. त्यांनी आत्महत्या केलेल्या ठिकाणी, खाण पिटाजवळ एक चिठ्ठीत सापडली.

दरम्यान, काणकोणच्या खोतीगावातील आवळी डोंगरमाथ्यावर गव्याच्या हल्ल्यात एका वयोवृद्धाचा मृत्यू झाला आहे. मात्र याप्रकरणी पोलिस तक्रार झाली नाही. वनखात्यालाही अधिकृतरित्या कळविण्यात आले नसल्याचे समोर आले आहे.

गव्याच्या हल्ल्यात (Attack) वृद्धाच्या मृत्यूची घटना बुधवारी सकाळी घडली आहे. आवळी येथील वृद्ध नागू जानू वेळीप (वय 84) गुरांसाठी चारा आणण्यासाठी डोंगर माथ्यावर गेले असताना गव्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. खोतीगावचे सरपंच उमेश गावकर यांनी याची माहिती दिली आहे. खोतीगाव अभयारण्य आणि अभायारण्याच्या बाहेरील परिसरात गव्याचा वाढता उपद्रव चालू झाला आहे दिवसाढवळ्याही गव्याचे कळप फिरताना दिसत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"तीन वर्षांत 9 विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दडपणामुळे आयुष्य संपवलं, अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा", आलेमाव यांची सरकारकडे मागणी

Sanju Samson: आशिया कप 2025 पूर्वी संजू सॅमसनची दमदार बॅटिंग, फक्त 'इतक्या' चेंडूत ठोकलं अर्धशतक

Online Betting Raid: गोवा पोलिसांचा डबल धमाका! ऑनलाइन सट्टेबाजी आणि दलालांवर एकाच वेळी कारवाईचा बडगा

Dewald Brevis: 22 वर्षीय बेबी एबीचं वादळ, ऑस्ट्रेलियाला धुतलं, विराट कोहली- बाबर आझमचा विक्रम उद्ध्वस्त

Goa Tourism: 'अन्यथा पर्यटन सेवा बंद करू!' म्हादईवरील रिव्हर राफ्टींग निधीसाठी पंचायत आक्रमक

SCROLL FOR NEXT