In Goa a girl tied her mother to rakhi  Dainik Gomantak
गोवा

मोरजीत आईने मुलीला आणि मुलीने आईला बांधली राखी

आई मुलीला राखी बांधून आपल्या मुलीची सर्वतोपरी रक्षा करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेते.

निवृत्ती शिरोडकर

मोरजी: श्रावण महिन्यातील भावा बहिणीच्या आतुरतेचा सण उत्सव म्हणजे रक्षाबंधन , बहिणीचा भाऊ कुठेही जगाच्या पाठीवर असला तरीही या दिवशी बहिण भावाला आणि भाऊ बहिणीला आठवण करत असतात बहिण भावाच्या मनगटावर पवित्र राखीचा धागा बांधून आपल्या संरक्षणाची हमी घेते व भाऊ हमी देतो.

मोरजी वरचावाडा येथील कृषी अधिकारी उमा रघुनाथ जोशी यांची कन्या ज्यावेळी तिला समज आली त्या वेळेपासून वैष्णवी ती राखी आपल्या आईला व आई मुलीला हाताच्या मनगटावर बांधण्याची प्रथा चालूच ठेवली आहे. वैष्णवी आपल्या आईला मोर पंखाचा आकार असलेली राखी बांधते, आई मुलीला राखी बांधून आपल्या मुलीची सर्वतोपरी रक्षा करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेते.

शाळेत गेल्यापासून मला रक्षा बंधनाचे महत्व कळू लागल्यावर, आपण हे रक्षा बंधन का करतो त्या वेळेपासून आपण आपल्या आईच्या मनगटावर राखी बांधते. राखी म्हणजे काय आहे तर तू आमचे रक्षण कर आजवर केले तसेच या पुढेही करत राहणार म्हणून आम्ही हा धागा बांधून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणाचा हा दिवस आहे. आजपर्यंत केवळ भाऊच रक्षण करत नाही तर आईही आपल्या मुलीची रक्षा करते. आजवर आपली आईनेही रक्षा करण्याची जबाबदारी घेतलेली आहे, त्यामुळे आम्ही दोघांची एकमेकांची रक्षा करण्याच्या उद्देशाने एकमेकाना राखी बांधत असतो. आईला आपण कृष्णाचा आकार असलेला मोरपंख राखी बांधते कारण आपण कृष्णाला खूप मानते , अडचणीच्या वेळी कृष्ण मित्र बनून मदत करतो , आपण आपल्या आईला कृष्णाच्या रुपात पाहते आणि ती आयुष्भर आपला सखा होवून आपली मदत करते असे वैष्णवी म्हणते.

उमा जोशी यांनी माहिती देताना रक्षा बंधन म्हणजे बहिण भावच नात अस मानल जात. द्रोपदीने कृष्णाला धागा बांधून तिच्या रक्षणासाठी कृष्ण धावून आला. आपली मुलगी मोठी झाली तेव्हा मी तिला हि कथा सांगितली. त्यावेळी मलाही वाटले तिने माही रक्षा आणि मी तिची रक्षा करावी मुलगी मला बांधते व मी मुलीला बांधते. आम्ही दोघेही एकमेकांची रक्षा करत असतो. ते रक्षण केवळ शाररीक नव्हे तर मानसिक सुद्घा आधार एकमेकाना समजून घेणे एकमेकाविषयी अतूट बंधन आहे. हे बंधन म्हणजे एकमेकीवरचा विश्वास असतो. कोणीही कुणाचे रक्षण करू शकतो हे वेगळे नाते आहे म्हणून आम्ही हे साजरे करतो असे उमा जोशी यांनी सांगितले.

हिंदू पंचांगाप्रमाणे श्रावणात येणारी राखी पौर्णिमा ही नारळी पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमा लागोपाठ दोन दिवस असेल तर दुसऱ्या दिवशी असणाऱ्या पौर्णिमेला साजरी करतात. याच दिवसाला'रक्षाबंधन' म्हणतात. या दिवशी रक्षाबंधनाचा कार्यक्रम असतो.हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची मंगल मनोकामना असते.

या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दीर्घ आयुष्य व सुख लाभो मिळो अशी कामना करतात. राखी बांधण्याचा अर्थ ती बांधणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वतःला गुंतवून त्या व्यक्तीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारणे. राखी बांधण्याच्या या सणातून स्नेह व परस्परप्रेम वृद्धिंगत करण्याची प्रथा अस्तित्वात आली आहे. रक्षाबंधन म्हणजे हातातील राखीस साक्षी मानून आपल्या बहिणीचे सदैव रक्षण करण्याचे वचन देणे. बहीण या दिवशी भावाला ओवाळून त्याचा हातावर राखी बांधते आणि आपले भावाविषयी प्रेम व्यक्त करते. या सणाचे आधारस्तंभ म्हणजे प्रेम, पराक्रम, सय्यम आणि साहस. निस्वार्थ प्रेमाची व्याख्या म्हणजे भावा-बहिणीचं नातं.

"राखी' ह्या शब्दातच "रक्षण कर', "राख म्हणजे सांभाळ' हा संकेत आहे. कुठल्याही कर्तबगार, धाडसी शूरवीराने याचक, दुर्बल, वृद्ध, आजारी, असहाय, अपंग व अबलांचे रक्षण करणे हा धर्म आहे. हेच लक्षात घेऊन याच दिवशी रेशमी धागा अशा करारी पुरुषाच्या हाती बांधून त्याच्याकडून रक्षणाचे अभय घेण्याची ही प्रथा आहे. हे अभय शास्त्राधारे पौरोहित्य करणारे पुरोहित आपल्या यजमानघरी स्वतः सर्वांना राखीचा रेशीमधागा मंत्रोच्चारांसह बांधून देतात. यातला गर्भित अर्थ नात्याचे रक्षण करणे हाच आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

SCROLL FOR NEXT