पणजी : एका भावाच्या अकाली निधनाने अनाथ झालेल्या तीन मुलींना (Three Daughters) सांभाळणारी आत्या (Aunty) ही केवळ अनाथ मुलींवरच्या प्रेमाने भारावून गेलेली नाही. तिच्या ह्रदयात असलेल्या भावाबद्दलच्या अतिव प्रेमभावनांचाच (Brothers love) हा अविष्कार आहे. उद्या रविवारी बहिण भावाच्या हातात राखी बांधून (Raksha Bandhan) संरक्षणाची कामना करेल. या पार्श्वभूमीवर धाट-मोले येथील ‘त्या’ बहिणीची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. श्रावणाच्या मध्यावर नारळी पौर्णिमा येते. किनारपट्टीच्या भागात सगळीकडेच या सणाला आगळे-वेगळे महत्व आहे. कोळी बांधवांसाठी हा दिवस म्हणजे पर्वणीच असते. यादिवशी गोव्यात अनेक ठिकाणी देवराईमध्ये पूजन करण्याची रीत आहे. यातून निसर्गपूजनाचे महत्व अधोरेखीत होते, असे जाणकार सांगतात.
विशेषतः नारळी पौर्णिमेला साजरा होणारा रक्षाबंधन हा सण भाऊ-बहिणींसाठी महत्वाचा ठरतो. सासुरवाशीनींना माहेरी जाऊन भावाला राखी बांधण्याची आस महिनाभरापासून लागलेली असते. भावाच्या हातात बांधल्या जाणाऱ्या एका धाग्याने हे नाते केवळ चिरकाल टिकून राहत नाही, तर त्यातून या नात्याला अंतःकरणीय भावबंधाची किनार लाभल्याची अनेक उदाहरणे पाहावयास मिळतात. अनेक बहिणींनी आपल्या भावाचा जीव वाचावा या भावनेतून किडणी, काळजाचा तुकडा दान केल्याची उदाहरणे या नात्याचे बंध द्विगुणीत करतात.
राखीचे आकार बदलले
काळाच्या ओघात भाऊ-बहिणीच्या नात्यालाही गालबोट लागल्याच्या घटना समाजात घडताना दिसतात, तरीही नात्याची वीण अद्याप टिकून आहे. हल्ली राख्याचे आकार बदलले आहेत. पूर्वी केवळ धागा वापरला जायचा. काही वर्षापूर्वीपर्यंत मोठ्या आकाराच्या राख्या बाजारात मिळायच्या. आता मात्र वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या बाजारात मिळतात. पूर्वी दूरवर राहणारी बहिण रक्षाबंधनापूर्वी महिनाभर आधीच पोस्टाने राखी पाठवायची. आता मात्र विविध ऑनलाईन कंपन्यांकडून एक दिवस आधी भावाला राखी पोहचवतात.
नारळी पौर्णिमा विशेषतः किनारी भागात साजरी केली जाते. रक्षाबंधन मात्र प्रत्येक राज्यात आणि बहुतेक समाजात साजरे होते. भाऊ-बहिणीच्या नात्याचे रेशीमबंध आधोरेखीत करणारा हा सण आहे. गोव्यातही या सणाला महत्व आहे, पण वेगळी अशी कोणतीही पार्श्वभूमी लोकसाहित्यात आढळत नाही. जात्यावरील गीतांतून मात्र भाऊ-बहिणीच्या नात्याचा पदर उलगडत जातो.
- पौर्णिमा केरकर, लोकसाहित्याच्या अभ्यासक
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.