Noise Pollution  Gomantak Digital Team
गोवा

Panaji Noise Pollution Case : 'सनबर्न'वर कृपादृष्टी कोणाची? मुख्य सचिवांची हायकोर्टात कबुली

सनबर्न ईडीएम महोत्सवावेळी संगीत वाजवण्यासाठी दिलेल्या परवान्यात नमूद केलेल्या डेसिबल्सपेक्षा अधिक क्षमतेने संगीत वाजवून ध्वनी प्रदूषण

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji Noise Pollution Case : गतवर्षी डिसेंबरमध्ये हणजूण येथे झालेल्या सनबर्न ईडीएम महोत्सवाच्या आयोजकांना परवाने देताना नियमांचे उल्लंघन झाले आहे.

ध्वनी प्रदूषणप्रकरणी १० लाख रुपये सुरक्षा ठेव जप्त, स्पेसबाऊंड वेब लॅब्स प्रा. लि.चे संचालक तसेच परवान्यासाठी अर्ज केलेल्या पराग उके यांच्याविरुद्ध म्हापसा न्यायालयात फौजदारी तक्रार दाखल केल्याची माहिती आज मुख्य सचिव पुनीत गोएल यांनी खंडपीठाला दिली.

सनबर्न ईडीएम महोत्सवावेळी संगीत वाजवण्यासाठी दिलेल्या परवान्यात नमूद केलेल्या डेसिबल्सपेक्षा अधिक क्षमतेने संगीत वाजवून ध्वनी प्रदूषण केल्याची जनहित याचिका राजेश सिनारी याने दाखल केली होती.

या प्रकरणी खंडपीठाने प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच पोलिसांना चांगलेच धारेवर धरले होते. मंडळ व पोलिस दोघेही या उल्लंघनाबाबतची जबाबदारी एकमेकांवर ढकलत असल्याने मुख्य सचिवांना अहवाल सादर करण्यास सांगितले होते.

दोषींवर कारवाई झाली का? : ध्वनी प्रदूषणाला

दोषींवर कारवाई झाली का? : ध्वनी प्रदूषणाला जबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई केली का? पर्यटन खात्याकडे १ कोटी रुपये सुरक्षा ठेव रक्कम होती, त्याचे काय? असा प्रश्‍न खंडपीठाने केला असता त्यासंदर्भात चौकशी करून माहिती देऊ असे ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT