cotarli sanguem Accident Dainik Gomantak
गोवा

Sanguem Accident : सांगे कोठार्ली येथे भीषण अपघात; अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी

ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने घडला अपघात

Rajat Sawant

Sanguem Accident : सांगे कोठार्ली येथे एक भीषण अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यु झाला असून एक गंभीर जखमी झाला आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाई करीत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, सांगे कोठार्ली येथे हा भीषण अपघात झाला आहे. पल्सर दुचाकीला भरधाव ट्रकने पाठीमागून धडक देत चिरडल्याने हा अपघात घडला. ही दुर्दैवी घटना रविवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास घडली.

भरधाव ट्रकने सांगे कोठार्ली येथे दुचाकीला मागून धडक दिली. या धडकेत दुचाकीचा तोल गेल्याने दुचाकीस्वार व दुचाकीवर बसलेली मागील व्यक्ती रस्त्यावर पडले. यावेळी त्यांच्या अंगावरुन ट्रक गेल्याने चिरडले गेले. भरधाव ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला.

अपघातात दुचाकीस्वार मंजू चारी याचा जागीच मृत्यु झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. जखमीला सांगेतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सहा महिन्यांपूर्वी अशाच एका अपघातात मंजूच्या धाकट्या भावाचा मृत्यू झाला होता. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT