selling narcotics
selling narcotics  Dainik Gomantak
गोवा

Narcotics Seized: गोव्यात तीन ठिकाणी छापेमारी; 16 लाखांचे ड्रग्ज जप्त

Sumit Tambekar

गेले काही दिवस गोवा राज्यात अमली पदार्थसंबधी वाढत असलेल्या गुन्ह्यावरुन प्रशासनाने गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी अमली पदार्थविरोधातील मोहीम तीव्र करणार असल्याच म्हटलं होतं. याबाबत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कारवाईचा वेग वाढवणार आता असल्याचं म्हटलं होतं.

(In a raid Anjuna police seized drugs worth 16 lakh three arrested)

ही घोषणा मात्र अद्याप कागदावरच असावी अशीच स्थिती सध्या गोवा राज्यात आहे. कारण आज पुन्हा गोवा पोलिसांनी अमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी तीन ठिकाणी छापेमारी केली आहे. ज्याच्यात तिघांना ताब्यात घेत 16 लाखांचे ड्रग्ज जप्त केले आहेत.

गोवा पोलिसांनी तीन ठिकाणच्या छापेमारीत तब्बल 16 लाखांचे ड्रग्ज जप्त केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी हणजूण येथे केलेल्या कारवाईत 83 वर्षीय अमेरिकन नागरिक असलेल्या जिओव्हानी रॉबर्ट कासोला याला अटक केली आहे. त्याच्याकडून 12 ग्रॅम एलएसडी लिक्विड आणि 45 ग्रॅम एमडीएमए असे एकूण 12 लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त केले आहेत.

याबरोबर पोलिसांनी म्हापसा येथे कर्नाटकातील रहिवासी असलेल्या 35 वर्षीय अश्रफ कासिम याच्यावर कारवाई करत 1.20 लाख रुपयांच्या 4 ग्रॅम एमडीएमएसह अटक केली.

तसेच डेल्टन दा कोस्टा या 26 वर्षीय युवकाला याला अटक करण्यात आली. त्याच्याकडे असलेल्या पिशवीमध्ये गांजाप्रमाणे संशयास्पद हिरवा रंगाचा पदार्थ होता. जो तपासणी केल्यानंतर चरस तेल आणि MDMA होते, ज्यांची एकूण किंमत 2.6 लाख रुपये होती. या तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले असुन पुढील पोलिस तपास सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Final Vote Turnout: गोव्यात 75.20 टक्के मतदान

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

Goa Eco-Friendly Booth Video: गोव्यातील इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची चर्चा; व्हिडिओ, फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT