North Goa Police Dainik Gomantak
गोवा

Calangute: वॉटर स्पोर्ट्स ऑपरेटर, हॉकर्सवर कारवाई; कळंगुट पोलिस अ‍ॅक्शन मोडवर

Calangute Police: कळंगुट समुद्रकिनाऱ्यावरील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या उद्देशाने पोलिसांच्या एका पथकाने परिसरात धडक मोहीम राबवली.

Pramod Yadav

म्हापसा: कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर अवैध पद्धतीने सुरु असलेल्या व्यवसायांविरोधात पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. पोलिसांनी परिसरातील अवैध व्यवसायांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलिस निरीक्षक परेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली आज (२० जानेवारी) ही धडक मोहीम राबविण्यात आली.

कळंगुट समुद्रकिनाऱ्यावरील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या उद्देशाने पोलिसांच्या एका पथकाने परिसरात धडक मोहीम राबवली. यावेळी वॉटर स्पोर्ट्सचे तीन ऑपरेटर आणि काही हॉकर्स विरोधात कारवाई करण्यात आली. ऑपरेटर आणि हॉकर्स विनापरवाना परिसरात व्यवसाय करत होते. पोलिसांनी बेकायदेशीर हॉकर्सना ताब्यात घेतले आहे.

समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटकांची सुरक्षा आणि वैध पर्यटन सुविधा सुनिश्चित करण्यासाठी अशा प्रकारची कारवाई सुरुच राहिल अशी माहिती कळंगुट पोलिसांनी दिली आहे.

काही दिवसांपूर्वी केरी पठारावर पॅराग्लायडिंग करताना नागपुरातील एका युवतीसह पायलटचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात चौकशीअंती पॅराग्लायडिंग अवैध असल्याचे समोर आले होते. त्यानंतर सरकाराने काही पॅराग्लायडिंगला स्थगिती दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT