Goa: पैसे कमावण्यासाठी दिल्लीकरांना व्यवसाय भाड्याने देऊ नका; पर्यटनमंत्री खंवटेंचे आवाहन

Goa Tourism: गोमंतकीयांनी दिल्लीवाल्यांना किंवा परराज्यातील लोकांना शॅक भाड्याने दिल्यास पर्यटन विभाग खपवून घेणार नाही; खंवटे
Goa: पैसे कमावण्यासाठी दिल्लीकरांना व्यवसाय भाड्याने देऊ नका; पर्यटनमंत्री खंवटेंचे आवाहन
Tourism Minister Rohan KhaunteDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: कायदा मोडणाऱ्या पर्यटन उद्योगांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश गोव्याचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी दिले आहेत. हरमल बीचवर झालेल्या खुनाच्या घटनेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

गोमंतकीयांनी दिल्लीवाल्यांना किंवा परराज्यातील लोकांना शॅक भाड्याने दिल्यास पर्यटन विभाग खपवून घेणार नाही, असे खंवटे म्हणाले.

हरमल बीचवरील शॅकवर अमर बांदेकर या स्थानिक युवकाची हत्या करण्यात आली होती. हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील रहिवाशाला भाड्याने दिलेल्या शॅकच्या कामगारांनी बांदेकरचा खून केला होता.

Goa: पैसे कमावण्यासाठी दिल्लीकरांना व्यवसाय भाड्याने देऊ नका; पर्यटनमंत्री खंवटेंचे आवाहन
Goa Schools Reopening: गोव्यात एक एप्रिलपासून सुरु होणार शाळा; मोफत पुस्तके, मिड - डे मिल मिळवण्यासाठी Apaar ID बंधनकारक

२६ जानेवारी रोजी समुद्रकिनाऱ्यावर ठेवलेल्या खुर्च्यांच्या वादातून हल्ला केला, यातच त्या युवकाचा खून झाला होता. एका महिन्यापेक्षा कमी कालावधीतील ही दुसरी घटना आहे, ज्यात शॅक कर्मचाऱ्यांनी एका व्यक्तीची हत्या केलीय. उत्तर गोव्याच्या किनारी भागात हल्ल्याची ही आठवी घटना आहे.

तंत्रज्ञानाचा वापर करून येत्या काळात प्रत्येक शॅकवर देखरेख ठेवली जाईल, असे खंवटे म्हणाले. शॅक व्यवसाय हा स्थानिक लोकांचा पारंपारिक व्यवसाय असून तो गोव्यातील लोकांपर्यंत मर्यादीत राहिला पाहिजे, असे ते म्हणाले.

Goa: पैसे कमावण्यासाठी दिल्लीकरांना व्यवसाय भाड्याने देऊ नका; पर्यटनमंत्री खंवटेंचे आवाहन
Arambol Beach Shack: हरमल किनाऱ्यावरील ‘त्या’ शॅकचा परवाना अखेर रद्द! 25 लाखांचा ठोठावला दंड; मांद्रेत 11 नंतर शॅक बंद

पर्यटन विभागाने शॅक वाटप प्रक्रिया सुलभ केली आहे. शॅक ओनर्स वेलफेअर सोसायटीच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत, असेही खंवटे यांनी स्पष्ट केले.

दिल्लीकर पैसे कमावण्यासाठी येथे येतात आणि अशा घटना घडतात. हे धंदे बाहेरील लोकांच्या ताब्यात जाऊ दिले जाऊ शकत नाहीत, असे खंवटे म्हणाले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com