Khemlo Sawant criticizes Amit Patkar Dainik Gomantak
गोवा

Goa Congress:...तर 2027 मध्ये काँग्रेसचा एकही आमदार निवडून येणार नाही, पाटकर प्रदेशाध्यक्ष म्हणून योग्य नाहीत; खेमलो सावंत

Goa Politics News: सध्याचे प्रदेशाध्यक्ष कोणाला काम देखील करु देत नाहीयेत. काँग्रेसची २०२७ च्या निवडणुकीसाठी पाहता परिस्थिती बिकट आहे.

Pramod Yadav

साखळी: अमित पाटकर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी योग्य नाहीत. मतदारसंघांमध्ये त्यांनी काहीच काम केले नाही. २०२७ मध्ये काँग्रेसला विजय हवा असेल, तर पाटकरांना अध्यक्षपदावरुन हटवा, अशी मागणी साखळीचे काँग्रेस नेते खेमलो सावंत यांनी केली आहे.

काँग्रेस पक्षापासून दूरावलेल्यांना एकत्र करुन युवा मोर्चाची स्थापन करून काम करण्याचा निर्धार खेमलो सावंत यांनी व्यक्त केला. अमित पाटकर अध्यक्ष असल्यास २०२७ मध्ये काँग्रेसचा एकही आमदार निवडून येणार नाही, असेही सावंत म्हणाले.

'साखळी मतदारसंघात पक्षाचे काम शून्य आहे. जसं व्हायला हवं तसं काम होत नाहीये. युवा मोर्चाच्या माध्यमातून आम्ही गावोगावी जाऊन काम करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढल्या महिन्यापासून त्याचे काम सुरु होईल', असे सावंत म्हणाले.

'सध्याचे प्रदेशाध्यक्ष कोणाला काम देखील करु देत नाहीयेत. काँग्रेसची २०२७ च्या निवडणुकीसाठी पाहता परिस्थिती बिकट आहे. युवा मोर्चाच्या माध्यमातून आम्ही काम करायचे ठरवले आहे. यासाठी अनेक नेत्यांचा मला पाठिंबा आहे, असे सावंत म्हणाले. दरम्यान, काँग्रेस सोडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट करताना पाटकर यांनी अध्यक्षपदावरुन हटवा', अशी मागणी त्यांनी केली. अंजली निंबाळकरांना देखील याबाबत कल्पना दिल्याचे सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: ग्रील कापून घरात घुसले, दाम्पत्याला बांधून ठेवलं, 50 लाखांचा ऐवज केला लंपास; म्हापशात बुरखाधारी दरोडेखोरांची दहशत

Nobel Prize Physics 2025: भौतिकशास्त्राचे नोबेल जाहीर! क्वांटम मेकॅनिकल टनलिंगच्या शोधासाठी तीन शास्त्रज्ञांचा गौरव

Horoscope: उद्याचा दिवस खास! 8 ऑक्टोबर रोजी शुभ धन योगामुळे 5 राशींचे भाग्य उजळणार, गणेशाचा असेल विशेष आशीर्वाद

Goa Crime: बुरखाधारी टोळीचा हैदोस! ग्रील कापून घरात घुसले अन् दाम्पत्याला बांधलं, लाखोंची रोकड अन् दागिने घेऊन झाले पसार

Goa News: खाणकाम मोफत मिळालेले नाही... अमित पाटकरांचा पालेकरांना हल्लाबोल; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT