Swindon Council gets first Goan, Indian Dy Mayor Dainik Gomantak
गोवा

अभिमानास्पद! दोन गोमन्तकीयांचा UK मध्ये डंका ; पती उपमहापौर तर पत्नीकडे शिक्षण विभागाची जबाबदारी

ब्रिटनमधील स्विंडन परिषदेत प्रथमच भारतीय व्यक्तीला उपमहापौरपद मिळाले आहे.

Pramod Yadav

Swindon Council gets first Goan, Indian Dy Mayor: गोव्यातील लोक जगातील विविध देशात विखुरले आहेत. युकेमधील विविध प्रांतात प्रामुख्याने अनेक गोमन्तकीय वास्तव्यास आहेत. असेच, इंग्लंडमधील स्विंडन येथून गोवा आणि भारतासाठी अभिमानास्पद घटना समोर आली आहे. ब्रिटनमधील स्विंडन परिषदेत प्रथमच भारतीय व्यक्तीला उपमहापौरपद मिळाले आहे.

वास्को येथील रहिवाशी असलेले इम्तियाज शेख यांची स्विंडन परिषदेत उपमहापौरपदी निवड झाली आहे. शुक्रवारी बार्बरा पॅरी यांची स्विंडन कौन्सिलच्या महापौरपदी नियुक्ती करण्यात आली त्यानंतर शेख यांची उपमहापौरपदी वर्णी लागली आहे. दरम्यान, इम्तियाज शेख यांच्याकडे कोणते खाते दिले जाणार याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

विशेष योगायोगाची बाब म्हणजे इम्तियाज शेख यांच्या पत्नी अदोराबेले अमरल-शेख यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले असून, त्यांच्याकडे शिक्षण विभागाची जबाबदारी असेल.

अदोराबेले अमरल-शेख स्विंडन येथील स्थानिक बरो निवडणुकीत सेंट्रल वॉर्ड येथून पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. शिवाय इम्तियाज शेख यांची उपमहापौरपदी निवड झाल्यामुळे त्यांच्या पत्नी अदोराबेल यांना उपमहापौर म्हणून संबोधले जाईल.

दरम्यान, पती-पत्नी दोघांनी या नियुक्तीबद्दल स्विंडन परिषद आणि तेथील नागरिक व लोक प्रतिनिधींचे आभार मानले आहेत.

'स्विंडनच्या उपमहापौरपदी माझी नियुक्ती केल्याबद्दल साऊथ स्विंडन लेबर पार्टी, सहकारी स्विंडन लेबर कौन्सिलर्स आणि चेंबरचे सहकारी नगरसेवक यांचे आभार मानतो.' असे इम्तियाज शेख यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT