Goa Board Exam Date Announced Dainik Gomantak
गोवा

Exam Date: महत्वाची बातमी; 10 वी, 12 वी द्वितीय सत्र परीक्षांच्या तारखा जाहीर

बारावीच्या द्वितीय सत्र विद्यार्थ्यांसाठी 15 मार्चपासून तर दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 1 एप्रिलपासून परीक्षा सुरू

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Board Exam Date Announced: गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी द्वितीय सत्र आणि दहावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या असून बारावीच्या द्वितीय सत्र विद्यार्थ्यांसाठी 15 मार्चपासून तर दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 1 एप्रिलपासून परीक्षा सुरू होणार आहे. दरवर्षी सुमारे 36,000 विद्यार्थी गोवा बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा देतात.

बारावीच्या विद्यार्थ्यांची द्वितीय सत्र परीक्षा कला, वाणिज्य, विज्ञान आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी इंग्रजी भाषेच्या पेपरने सुरू होईल आणि ती 31 मार्च रोजी संपेल. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी, परीक्षा 1 एप्रिल रोजी प्रथम भाषेच्या पेपरने सुरू होईल आणि 22 एप्रिल रोजी संपेल. प्रत्येक परीक्षा सकाळी 9.30 वाजता सुरू होईल. महामारीच्या काळात राबविण्यात आलेल्या विशेष मूल्यमापन योजनेनुसार, आणि चालू शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी देखील लागू आहे.  

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीचा अभ्यासक्रम पहिल्या आणि दुसऱ्या टर्मसाठी दोन समान भागांमध्ये विभागला गेला आहे. शैक्षणिक वर्षाच्या शेवटी एकच सार्वजनिक परीक्षा आयोजित करण्याऐवजी बोर्ड या दोन्ही टर्म-एंड परीक्षांचे आयोजन करते. गोवा बोर्डाच्या म्हणण्यानुसार, दोन परीक्षा घेतल्याने विद्यार्थ्यांवर सार्वजनिक परीक्षेत एकाच वेळी संपूर्ण वर्षाच्या अभ्यासक्रमाचा अभ्यास करण्याचा आणि उत्तरे देण्याचा दबाव कमी झाला.

पहिली टर्म परीक्षा बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित असली तरी दुसरी टर्म परीक्षा नेहमीची व्यक्तिनिष्ठ प्रकारची असते. या दोन परीक्षांचे निकाल, अंतर्गत गुणांसह, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या अंतिम निकालासाठी एकत्रित केले जातील

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tiger Death: निसर्गाचा रक्षणकर्ताच धोक्यात! मानवाच्या क्रूरतेमुळे वाघांचा जीव टांगणीला; पूर्वजांनी पुजलेला 'व्याघ्रदेव' रक्ताळला

Fake ED Officer Scam: तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंड बलरामची पोलिसांना हुलकावणी, हायकोर्टानं फेटाळला जामीन

Goa NCRB Crime Report: "नारी शक्ती वंदन" फक्त नावापुरतेच? एनसीआरबी अहवालावरुन काँग्रेसचा सावंत सरकारवर हल्लाबोल, गोव्यात सुशासनाचा दावा फोल

Chorla Ghat Accident: चोर्ला घाटात धडक देऊन पळ काढणारी बस डिचोलीत रोखली, तरुणांनी दाखवला इंगा; मध्यरात्री हायव्होल्टेज ड्रामा

Goa Land Grab Scam: सुलेमान खानला अखेर जामीन मंजूर! हस्ताक्षराचा अहवाल ठरला गेमचेंजर; मेरशी सत्र न्यायालयाचा निर्णय

SCROLL FOR NEXT