Panaji Hit And Run Case Dainik Gomantak
गोवा

Panaji Hit And Run Case: पोलिसांच्या हाती महत्त्वाचा पुरावा, पादचाऱ्याला धडक देऊन पसार झालेल्या कारचालकापर्यंत पथक पोहोचणार?

चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

दैनिक गोमन्तक डिजिटल

Panaji Hit And Run Case: मेरशी सर्कलजवळ शनिवारी पहाटेच्या सुमारास पादचारी मनोज शशीधरन याला कारने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला होता. अपघात झाल्यानंतर तेथे न थांबता पसार झालेल्या कारची माहिती जुने गोवे पोलिसांना मिळाली असून त्याचा क्रमांक मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

ही कार मडगावच्या दिशेने गेल्याचे आतापर्यंत पोलिसांना तपासात आढळले आहे. त्या कारचा शोध घेण्याबरोबरच चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनोज शशीधरन हा मेरशी सर्कलकडून जात असताना मागाहून आलेल्या स्वीफ्ट डिझायर कारने जोरदार धडक दिली. या धडकेनंतर कार चालक न थांबता थेट निघून गेला.

जखमी शशीधरनला गोमेकॉत नेले असता त्याला मृत घोषित केले होते. या घटनेप्रकरणी त्याच्या कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे कारचा शोध लावण्याचे मोठे आव्हान जुने गोवे पोलिसांसमोर आहे.

मेरशी ते पणजी या परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे मेरशी जंक्शन येथील अत्याधुनिक वाहतूक सिग्नल गेले काही दिवस बंद असल्याने या अपघातग्रस्त गाडीचा शोध घेणे कठीण बनले आहे.

आज सीसीटीव्ही फुटेज मिळविणार

मडगाव व फोंडा या दिशेने काही आस्थापनांच्या बाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही गाडी मडगावच्या दिशेने गेल्याचे आढळले आहे. गेले दोन दिवस सुट्टीमुळे काही आस्थापनांकडून सीसीटीव्ही फूटेज मिळवणे शक्य झाले नाही. सोमवारी काही फूटेज मिळवून कारचा क्रमांक शोधण्याचा प्रयत्न होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT