Poha | Fov Canva
गोवा

Diwali 2024: फोव कांडप गेलें मात गोंयान 'परंपरा' जपली!

Goa Diwali 2024: गोव्यात दिवाळीच्या सणात पोह्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. पोहे कांडणे ही एक पारंपरिक प्रक्रिया असून त्याशिवाय गोव्यातील दिवाळीची कल्पनाही केली जाऊ शकत नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

Role of Poha in Goan Diwali Celebrations

सपना सामंत

वाळपई: गोव्यात दिवाळीच्या सणात पोह्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. पोहे कांडणे ही एक पारंपरिक प्रक्रिया असून त्याशिवाय गोव्यातील दिवाळीची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. तथापि, सध्याच्या काळात पोहे कांडणाऱ्या गिरण्या हळूहळू बंद होत आहेत आणि काहीच ठिकाणी त्या सुरू आहेत.

पूर्वी ग्रामीण भागातील महिला वर्ग मुसळाच्या साहाय्याने घरातच भातापासून पोहे करायच्या. त्यानंतर गिरणी आल्या आणि आता त्याही बंद होत आलेल्या आहेत. सत्तरीत तर पोहो  कांडण्यासाठी एकही गिरण उपलब्ध नसल्याने पोह्यांसाठी म्हापसा किंवा फोंडा, बोरी, निरंकाल या ठिकाणी जावे लागते. हळू हळू भातशेती करणे बंद झाल्यामुळे बहुतेक गिरणी बंद पडल्या आहेत.

निरंकाल-फोंडा येथील सामंत राईस अँड फ्लोअर मिल, ज्याला ‘ सुपर मोती’  म्हणून ओळखले जाते. ३५ वर्षांपूर्वी  भानुदास सामंत  यांनी या मिलची स्थापना केली. पूर्वी  मोठ्या प्रमाणात लोक भात गिरणीवर यायचे. मात्र, हळू हळू लोकांची संख्या कमी होऊ लागली; कारण म्हणजे शेती करणे बंद झाले. 

आता दिवाळी तोंडावर आलेली आहे, त्यामुळे गेल्या काही दिवसापांसून सत्तरी तसेच इतर भागातील नागरिक भात घेऊन गिरणीवर येतात. यंदा पावसामुळे भाताची अजून कापणीच झालेली नाही. यंदा चुकून कोणी नवीन भात घेऊन आले. अनेकांनी गेल्या वर्षीचेच भात पोहे करण्यासाठी आणलेले पाहिले आहे, अशी माहिती  भानुदास सामंत  यांनी दिली.

मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे गिरण्या बंद

‘पोहे कांडप’ ही संकल्पना आता कालबाह्य ठरू लागली आहे. पोह्यांच्या गिरणीवर भट्टीवर काम करणारे मनुष्यबळ मिळेनासे झाल्यावर आता गावोगावच्या पोह्यांच्या गिरणी बंद पडत चालल्या आहेत.

पोह्यांसाठी ‘दामगो’ नावाचे मोठे भात पूर्वी लावले जात होते. या पारंपरिक बियाण्यापासून शेतकऱ्यांनी फारकत घेण्यापासून पोहे कांडप ही संकल्पना गुंडाळली जाण्यास सुरवात झाली. त्यानंतर आधुनिक भाताचे पोहे हे आकाराने छोटे होत असल्याने पोहे कांडपापासून शेतकरीही दूर होत गेला. पूर्वीच्या काळात दिवाळीला आठवडाभर राहिला असताना पोहे कांडप गिरणीवर भात घेऊन रांग लावली जात असे. क्वचितप्रसंगी २४ तासांनंतर पोहे मिळत.

या साऱ्याची सुरवात लाल पोहे हवे असतील तर गरम पाण्यात भात २४ तास आधी भिजत घालण्यातून होत असे. पांढऱ्या पोह्यांसाठी थंड पाण्यात भात भिजत घातले जाई. त्यानंतर हे भात गिरणीवर नेले जाई. तेथील भट्टीवर ठेवलेल्या मोठ्या व्‍यासाच्या कढईतील वाळूत हे भात भाजले जाई आणि नंतर ते भात गोलाकार फिरणाऱ्या गिरणीत ओतल्यावर पोहे तयार होत. ही सारी दगदग सोसण्याची नव्या पिढीची तयारी नाही त्यामुळे बाजारातून तयार पोहेच आणण्याला पसंती दिली जाते.

पोहे म्हणजेच दिवाळी!

राज्यात दिवाळीचा सण म्हणजे पोहे हे समीकरण आहे. येथे फराळ कमी, जास्त होत असेल; पण पोहे हे प्रत्येकाच्या घरी असतातच. गरीबातल्या गरीबाच्या घरी गोड व तिखट पोहे केले की दिवाळी साजरी झाली, असे मानले जाते.

पोहे कांडण्याचा दर १५ ते २५ रुपये प्रतिकिलो

१.सध्या पोहे कांडणाऱ्या गिरण्यांची संख्या फारच कमी झाली आहे. ज्यांच्याकडे स्वतःची शेती आहे, तेच या गिरण्यांचा जास्त उपयोग करतात. पूर्वी गावागावांत या गिरण्या असत; परंतु आधुनिक तंत्रज्ञान आणि शहरीकरणामुळे त्यांची संख्या कमी झाली आहे.

२.तांदळाच्या गुणवत्तेनुसार आणि पोहे कांडण्याच्या प्रक्रियेच्या गुंतागुंतीनुसार दर ठरवले जातात. सध्या गोव्यात एक किलो पोहे कांडण्याचा दर सरासरी १५ ते २५ रुपयांपर्यंत असतो. मात्र, गिरणीवर अवलंबून दर कमी-जास्त होऊ शकतो.

3.गुळेली-सत्तरी येथील युवा शेतकरी योगेश देसाई म्हणाले, सत्तरीत पोहे कांडण्याची  गिरण नाही, त्यामुळे आपण पोहे कांडण्यासाठी फोंडा भागात जातो. प्रतिकिलो भात कांडण्यासाठी १५  ते २५ रुपये दर आहे. गेल्या वर्षी आपण १०० किलो भाताचे पोहे केले होते. त्यातील ५० किलो पोहे ६० रुपये किलोने विकले. बाकी ५० किलो असेच  कोणा कोणाला द्यावे लागले. त्यामुळे यंदा आपण मागणीनुसारच  पोहे करून या दोन दिवसांत आणून त्यांची विक्री करणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Drishti Lifesavers Rescue: रशियन महिला अडकली समुद्रात, फ्रेंच महिलेवर भटक्या जनावराचा हल्ला; दृष्टी जीवरक्षकांकडून 10 जणांना जीवदान

Kala Academy: कला अकादमी नूतनीकरणाचे काम कृती दलाकडून 'नापास', काय नोंदवले मत वाचा

Snake In Train: झारखंड - गोवा ट्रेनच्या एसी कोचमध्ये आढळला साप, प्रवाशांची पळता भुई थोडी Video

Goa News: पणजीतील केएफसीला प्रदूषण मंडळाची नोटीस, परवाना मिळेपर्यंत काम बंद ठेवण्याचा आदेश; वाचा दिवसभरातील घडामोडी

Online Cricket Betting: पर्वरीत क्रिकेट सट्टाबाजीचा पर्दाफाश; ५ जणांना अटक, सुमारे लाखभर रुपयांचे इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त

SCROLL FOR NEXT