Australian celebrity chef Sarah Todd is a frequent traveler between Australia and Goa
ऑस्ट्रेलियन सेलिब्रिटी शेफ सारा टोड हिची ऑस्ट्रेलिया आणि गोवा दरम्यान सतत भ्रमंती चालू असते. गोव्याच्या तसेच भारताच्या विविध प्रांतांतील पाककृतींची ओळख तिने जगाला करून दिली आहे. साराला गोमंतकीय पाककृतींचा आस्वाद घ्यायला आणि त्यासंबंधी अधिक जाणून घ्यायला आवडते. पोर्तुगीज प्रभावातून निर्माण झालेल्या गोमंतकीय पाककृतीच्या स्वादात काहीतरी विशेष आहे असे ती म्हणते.
गोव्यात मोटरसायकल चालवत प्रवास करणे तिला विशेष आवडते. भारतात इतर ठिकाणी मात्र मोटरसायकलवरून प्रवास करायला ती पसंत करत नाही कारण इतर ठिकाणी आपण 'नर्व्हस' होते असे ती म्हणते. पण केसात वारा भरून गोव्यातील मोकळ्या रस्त्यावरून फिरणे, सुंदर जागा दिसताच थांबणे, रस्त्यावरील पाट्या नजरेआड करून सुंदर जागांमध्ये हरवून जाणे हा गोव्यात फिरण्याचा उत्तम मार्ग आहे असे तिला वाटते.
गोव्यातील समुद्र किनाऱ्यावरच्या ओल्या वाळूत पाय रुतवत चालणे तिच्यासाठी एक आनंददायक गोष्ट आहे. किनाऱ्यावरून चालताना समुद्राचा गाजणारा आवाज मनाला शांतता देतो असे ती म्हणते. ऑस्ट्रेलियातील नॉर्थ क्विन्सलँड येथे ती लहानाची मोठी झाली आहे. तोदेखील गोव्यासारखाच उष्ण कटिबंधीय प्रदेश आहे. त्यामुळे गोवादेखील तिला सुरक्षित आणि आरामदायक वाटतो.
निसर्ग तिला आवडतो. गोव्यातील दोन रेस्टॉरंट्समध्ये तिची भागीदारी आहे. तिथं तिने सुमारे ८००० झाडे आणि रोपे पावसाळ्यापूर्वी लावली आहेत. त्या रोपट्यांनी आणि झाडांनी पावसाळ्यानंतर जे हिरवे रूप धारण केले आहे त्यामुळे ती खुश आहे. गोव्यातील निसर्ग आपोआपच भव्य आणि देखणे रूप घेतो त्यामुळे नेहमीच इथे राहावे असे तिला वाटते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.