Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

New Labour Law: कामगारांना समान वेतन, डिजिटल पेमेंट! केंद्र सरकारच्या नव्या कायद्यांची गोव्यात अंमलबजावणी होणार; मुख्यमंत्री सावंतांची घोषणा

Goa CM Pramod Sawant: केंद्र सरकारने कामगारांसाठी लागू केलेल्‍या वेतन, औद्योगिक संबंध, सामाजिक सुरक्षा आणि व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाची परिस्थिती या चारही नव्‍या कायद्यांची राज्‍यात लवकरच अंमलबजावणी करण्‍यात येणार.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: केंद्र सरकारने कामगारांसाठी लागू केलेल्‍या वेतन, औद्योगिक संबंध, सामाजिक सुरक्षा आणि व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाची परिस्थिती या चारही नव्‍या कायद्यांची राज्‍यात लवकरच अंमलबजावणी करण्‍यात येणार आहे. या कायद्यांमुळे कामगारांच्‍या वेतनात समानता येऊन त्‍यांना त्‍याचा मोठा फायदा मिळेल, असा विश्‍‍वास मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना व्‍यक्त केला.

केंद्र सरकारने गत २१ नोव्‍हेंबर रोजी चार नवीन कामगार कायदे लागू केले आहेत. या नव्‍या कायद्यांमुळे जुने २९ केंद्रीय कामगार कायदे संपुष्टात आले आहेत. नवीन कायद्यांमुळे असंघटित क्षेत्रातील कामगार, गिग वर्कर्स, स्थलांतरित आणि महिला कामगारांचे वेतन तसेच त्‍यांची सामाजिक व आरोग्य सुरक्षेची हमी मिळेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी त्‍यावेळी जाहीर केले होते.

कामगारांच्‍या कल्‍याणासाठी केंद्र सरकारने घेतलेल्‍या या निर्णयांचे राज्‍य सरकारने स्‍वागत केले असून, या चारही नव्‍या कायद्यांची गोव्यात (Goa) लवकरात लवकर अंमलबजावणी करण्‍यात येणार असल्‍याचे मुख्‍यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. या कायद्यांमुळे कामगारांना डिजिटल पद्धतीने वेतन मिळेल. वेतनात स्‍त्री आणि पुरुष असा भेदभाव केला जाणार नाही. त्‍यामुळे कामगारांना समान वेतन देण्‍यात येईल. या सर्व गोष्‍टींची राज्‍यात अंमलबजावणी केली जाणार असल्‍याने लाखो कामगारांना त्‍याचा फायदा मिळेल, असेही मुख्‍यमंत्री डॉ. सावंत यांनी स्‍पष्‍ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ZP Election: लेकीचे पहिले मतदान, वडिलांना 'विजयाचा' विश्वास! CM सावंतांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

Dabolim: लोकांच्या जीवाशी खेळ! उड्डाण पुलाच्या कामामुळे चालकांना धोका, वास्कोत नियमांची ऐशीतैशी; सळ्यांची धोकादायक वाहतूक

Vijay Merchant Trophy 2025: गोव्याची एक डाव, 152 धावांनी हार! दुसऱ्याच दिवशी पराभव; सलग तिसऱ्यांदा हाराकिरी

Goa Live News: आमदार राजेश फळदेसाई यांनी बजावला मतदानाचा हक्क

Goa ZP Election: पंचायत मंत्री माविन गुदिन्होंनी बजावला मतदानाचा हक्क! म्हणाले, 'हा लोकशाहीचा उत्सव'

SCROLL FOR NEXT