New Criminal Laws: नव्या फौजदारी कायद्याअंतर्गत गोव्यात दोन गुन्हे दाखल; पहिली FIR काय?

Two FIR registered Under New Criminal Laws: विशेष म्हणजे दिल्लीतील एका विक्रेत्याविरोधात हाच गुन्हा नोंद करण्यात आलाय.
नव्या फौजदारी कायद्याअंतर्गत गोव्यात दोन गुन्हे दाखल; पहिली FIR काय?
Two FIR registered Under New Criminal LawsDainik Gomantak

देशात आजपासून तीन नवे फौजदारी कायदे लागू झाले आहेत. नव्या कायद्यांतर्गत गोव्यात दोन गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. दक्षिण गोव्यात एक आणि दुसरा गुन्हा उत्तर गोव्यात दाखल झाला आहे.

मडगाव पोलिसांनी भारतीय न्याय संहिता अंतर्गत पहिला गुन्हा नोंद केल आहे. न्याय संहितेच्या कलम 285 अंतर्गत हा गुन्हा नोंद करण्यात आलाय. आज (सोमवारी) दुपारी बारा वाजता मडगाव पोलिसांनी हा गुन्हा नोंदवून घेतला. वाहतूक अथवा मार्गात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी या कलमाचा वापर केला जातो.

तर, दुसरा गुन्हा पणजी पोलिसांना दाखल केला असून, हा गुन्हा देखील कलम 285 अंतर्गत नोंदविण्यात आला आहे. नारळपाणी विक्रेता निसार मकबुल बल्लारी (53, ताळगाव, गोवा) याच्याविरोधात हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. निसारने गाड्यावरुन नारळपाणी विक्री करत वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

नव्या फौजदारी कायद्याअंतर्गत गोव्यात दोन गुन्हे दाखल; पहिली FIR काय?
Goa : बीचवरच अवघ्या दीड हजारात 'ओपन एअर मसाज', व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना आली जाग

विशेष म्हणजे दिल्लीतील एका विक्रेत्याविरोधात हाच गुन्हा नोंद करण्यात आलाय. फूटब्रिचवर अडथळा निर्माण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देशात आजपासून तीन नवे फौजदारी कायदे लागू झाले आहेत. IPCच्या जागी भारतीय न्याय संहिता, CRPCच्या जागी भारतीय नागरी सुरक्षा संहिता तर भारतीय पुरावा कायद्याच्या जागी भारतीय साक्ष अधिनियम लागू झाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com