Traffic jams Dainik Gomantak
गोवा

गोव्यात पर्यटनाचा परिणाम; मडगाव-पणजी महामार्गावर तासंतास ट्राफिक जाम

मडगाव-पणजी महामार्गावरील ३६ कि.मी.चा रस्ता ४0 मिनिटात पार करता येतो. पण वाहतूक कोंडीमुळे मडगाव गाठायला दोन तासांहून अधिक वेळ लागतो.

दैनिक गोमन्तक

मडगाव (Margao) -पणजी (Panaji) महामार्गावरील वाहतूक कोंडीने (Traffic jams) बुधवारी महाकाय रूप घेतले. फुला खुरीसकडून सुरू झालेली वाहतूक कोंडी झुआरी पुलापर्यंत होती. त्यामुळे वाहन चालक, प्रवाशी हैराण झाले. ३६ कि. मी. चा रस्ता ४0 मिनिटात पार करता येतो. पण वाहतूक कोंडीमुळे मडगाव गाठायला दोन तासहून अधिक वेळ लागला. किमान पंधरा ते सोळा ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. ही वाहतूक कोंडी नित्याचीच झाल्याने वेळेचा अपव्यय होत आहे.

देवराज फळदेसाई म्हणाले, सरकारी, खासगी व इतर कामानिमित्त हजारो लोक नेहमी मडगाव-पणजी, पणजी-मडगाव प्रवास करतात. पेट्रोल दरवाढीचा फटका बसलेले कित्येक लोकांनी गाड्या सोडून नेहमी कदंब बसने प्रवास करण्यास सुरुवात केली. पणजी बसस्थानकातून निघालेली बस अथवा गाडी हिरा पेट्रोल पंपपासूनच पुढे सरकत नाहीत. बुधवारी तर खूपच अडचणी निर्माण झाल्या.

गुगल मॅपवर रहदारीचा आढावा घेतल्यानंतर मडगाव ते पणजी यामहामार्गावर एकूण १५ छोटे ब्लॉक आणि तीन ते चार कि. मी.चा मोठा ब्लॉक दिसून आला. फुला खुरीसपासून सुरु झालेली वाहतूककोंडी पुलाच्या पुढेही तासभर कायम होती. या पूर्ण मार्गावर हजारोच्या संख्येने लोक आपापल्या गाड्यांमध्ये अडकून पडले होते.अगशी पोलिस स्थानकाचे निरीक्षक सूरज सामंत म्हणाले, वाहनचालकच जबाबदार आहेत. वाहनचालक पुढे निघून जाण्याच्या प्रयत्नात तिन-चार लाईन तयार करतात. पुढे एक पदरी रस्ता येताच कोंडी निर्माण होते. अर्धा तासाच्या कामाकरिता पणजीला गेलो आणि सपशेल फसलो, असे कुठ्ठाळीचे नागरिक प्रणव पार्सेकर यांनी सांगितले.

पर्यटनाचा परिणाम

पणजीहून सात वाजता निघालेले प्रवासी मडगावला नऊ नंतर पोचले. झुआरी पुलाचे, काम त्यात पर्यटनाचा हंगामाचा परिणाम. यामुळे वाहतूक कोंडी होत आहे, जानेवारीपर्यंत ही अशीच परिस्थिती राहील, अशी चिन्हे दिसत आहेत. गेल्या तीन चार दिवसांपासून आम्हांला वाहतूक कोंडीचा त्रास प्रवाशांना करावा लागत आहे, यावर संबंधितांनी तोडगा काढावा, अशी नागरिकांची मागणी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT