Panjim Municipality Dainik Gomantak
गोवा

Panjim Municipality: महापालिकेचा कारभार होणार स्थलांतरित

सरकारकडून मान्यता बाकी- नवा इमारत आराखडा होणार तयार

दैनिक गोमन्तक

Panjim Municipality: पणजी महानगरपालिकेची इमारत असुरक्षित बनली आहे. त्याशिवाय ही जागाही अपुरी आहे. त्यामुळे सध्या इमारतीतील कारभार सरकारी इमारतीत स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याविषयी महापालिकेने राज्य सरकारकडे स्थलांतराच्या मंजुरीसाठी पत्रव्यवहारही केला आहे.

ती मंजुरी बाकी असून, ती मिळाल्यास सध्याच्या इमारतीतील कारभार स्थलांतर होणार आहे.महापालिकेची इमारत फार जुनी आहे.

त्याशिवाय महापालिकेने 11 कोटीच्या इमारतीच्या आराखड्याला मंजुरी दिली आहे. त्यानुसार इमारतीच्या दक्षिणेकडील बाजूची इमारत पाडण्यात आली आहे. सध्याची इमारत असुरक्षित मानली जात आहे, त्याशिवाय या इमारतीतील जागाही अपुरी पडत आहे.

त्यामुळे येथील कारभार दुसऱ्या ठिकाणी हलवावा, यासाठी प्रयत्न सुरू होते. महापालिकेने एका सरकारी कार्यालयात हा कारभार हलविता येणे शक्य असल्याचे सांगत ती इमारत आम्हाला मिळावी, अशा आशयाचे पत्र राज्य सरकारला पाठविले आहे.

सध्या ज्याठिकाणी नवी 11 कोटींची इमारत उभारली जाणार आहे, त्याऐवजी सध्याच्या इमारत हटविण्याचा विचारही होऊ शकतो आणि तो भागही नव्या इमारतीच्या आतमध्ये घेतला जाणार असल्याची माहिती हाती आली आहे. गोवा राज्य नागरी विकास खात्यातर्फे ही 11 कोटींची इमारत उभारली जात आहे,

त्यातच आणखी काही बदल करून नव्याने आराखडा तयार करून तरतूद केलेल्या रकमेत आणखी भर घालून इमारत उभारण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. त्यानुसारच महापालिका व्यवस्थापनाने पावले उचलली असल्याचे सांगितले जाते.

महापालिकेच्या इमारतीभोवताली असणाऱ्या हॉटेल, दुकाने, मेडिकल हा सर्व परिसरही हटवून त्याठिकाणी इमारत उभारण्याचा प्रस्ताव आहे. त्यानुसार आराखडाही तयार केला गेला असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT