Rain in Goa Dainik Gomantak
गोवा

गोव्यात आणखी चार दिवस बरसणार पावसाच्या सरी

हवामान खात्याचा अंदाज, आंबा, काजूसह उन्हाळी पिकं धोक्यात

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यात विविध ठिकाणी काल मंगळवारी पावसाच्या सरी कोसळल्या. आज बुधवारीही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आता पुढील चार दिवस राज्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. पावसामुळे तापमानात काहीशी घट झाली असली तरीही मंगळवारी पणजीत 33.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

उत्तर गोव्यातील (North Goa) साखळी, मये, वाळपई, डिचोलीसह बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह दमदार पावसाची हजेरी पाहायला मिळाली आहे. यापूर्वीच हवामान खात्याने 5 आणि 6 एप्रिल रोजी पावसाचा अंदाज वर्तवला होता, तो खरा ठरला आहे. पावसासह वेगवान वाऱ्यांमुळे झाडं आणि झाडांच्या फांद्याही कोसळल्याचं चित्र पाहायला मिळालं. यामुळे काही ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला होता. तामिळनाडू, मराठवाडा, कर्नाटक या भागातही कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाने (Rain) हजेरी लावली. यासोबतच पुढील काही दिवस गोव्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दुसरीकडे मडगावसह दक्षिण गोव्यातील (South Goa) बहुतेक भागांना मंगळवारी रात्री आलेल्या अवकाळी पावसाने झोडपून काढले. अकस्मात पाऊस आल्याने लोकांची त्रेधातिरपीट उडाली. मडगावात पावसामुळे कित्येक ठिकाणी पाणी साचून राहिल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाल्याचे दृश्य दिसून येत होते. सांगे, केपे, काणकोण या भागांनाही वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने झोडपून काढले. वादळी वाऱ्याचा वीज यंत्रणेवरही परिणाम झाला. वारंवार वीज जाण्याचे प्रकार रात्रभर चालू असल्याने लोक हैराण झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT