Goa weather update March 29 Dainik Gomantak
गोवा

Yellow Alert In Goa: उन्हाच्या तडाख्याने हैराण झालेला गोमंतकीय सुखावणार! गोव्यात 29 मार्चसाठी 'यलो अलर्ट'; वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

IMD Issues Yellow Alert for Goa on March 29: उन्हाच्या वाढत्या तडाख्याने हैराण झालेल्या गोमंतकीयांना अवकाळी पावसाने काहीसा दिलासा दिला. राज्यात गेल्या दोन दिवसांत मुसळधार सरी बरसल्या.

Manish Jadhav

IMD Issues Yellow Alert for Goa on March 29

पणजी: उन्हाच्या वाढत्या तडाख्याने हैराण झालेल्या गोमंतकीयांना अवकाळी पावसाने काहीसा दिलासा दिला. राज्यात गेल्या दोन दिवसांत मुसळधार सरी बरसल्या. सत्तरीसह अनेक भागात पावसाने हजेरी लावल्याने पडझडीच्या घटनांसह वीजपुरवठा खंडित झाला. यातच आता, हवामान विभागाने पुन्हा एकदा पावसाचा 'यलो अलर्ट' वर्तवला. शनिवारसाठी (29 मार्च) हा यलो अलर्ट हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला.

यलो अलर्ट जारी

हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गोव्यात (Goa) हलक्या ते मध्यम पावसाचा 'यलो अलर्ट' जारी केला आहे. राज्याच्या उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्ह्यांमध्ये या हवामान बदलांचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. राज्यातील उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या काळात 30-40 किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह पाऊस पडू शकतो.

सत्तरीत अवकाळी पावसाची हजेरी

दोन दिवसांपूर्वी, सत्तरीत (Sattari) वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती. दुपारपासूनच पावसाचे वातावरण तयार झाले होते. खोतोडा, कुंभारखणसह सत्तरीतील इतर भागात पावसाने दस्तक दिली होती. या पावसामुळे सत्तरीतील काही भागात पडझडीच्या घटनांसह वीजपुरवठाही खंडित झाला होता.

काजू, आंबा पिकांवर परिणाम

गोव्यात मार्च ते मे या कालावधीत काजू आणि आंबा पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड आणि उत्पादन होतं. मात्र, हवामान बदलामुळे अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, ज्याचा थेट परिणाम या पिकांवर होऊ शकतो. राज्यात पुढील काही दिवस हवामान अस्थिर राहू शकतं. त्यामुळे काजू आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी संभाव्य नुकसान टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी. गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे पिकांचं नुकसान होण्याची शक्यता अधिक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ISL 2026: 'एफसी गोवा'चा धडाका, दोन गोलने विजय; मुंबई सिटीची अपराजित दौड खंडित

Horoscope: मेहनतीला मिळणार यशाची सुवर्ण जोड! 'गजकेसरी' योगामुळे 5 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस, संपत्तीत होणार अपार वाढ

GCA Premier League: 'धेंपो' गोव्यातील 'चॅम्पियन' क्रिकेट क्लब, 'चौगुले'विरुद्धच्या अंतिम लढतीत पहिल्या डावातील आघाडीवर बाजी

VIDEO: LIVE मॅचमध्ये हायव्होल्टेज ड्रामा!निमंत्रण न मिळाल्याने संतापला तरुण, थेट खेळपट्टीवरच ट्रॅक्टर फिरवला; पाहा व्हिडिओ

Margao Muncipal: नगरपालिका उद्यानात 'कॅफेटेरिया'चा प्रस्ताव मंत्री दिगंबर कामत यांनीच दिला! प्रभव नायक यांचा आरोप

SCROLL FOR NEXT