Goa Rain Update Dainik Gomantak
गोवा

Goa Rain: पावसाचा जोर वाढणार? 2 दिवस ऑरेंज अलर्ट जारी; प्रशासन सतर्क

Goa Monsoon: भारतीय हवामान खात्याने (IMD Goa) दिलेल्या माहितीनुसार, १७ ऑगस्ट आणि १८ ऑगस्ट रोजी राज्यभर “ऑरेंज अलर्ट” जारी करण्यात आला आहे.

Sameer Panditrao

गोव्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD Goa) दिलेल्या माहितीनुसार, १७ ऑगस्ट आणि १८ ऑगस्ट रोजी राज्यभर “ऑरेंज अलर्ट” जारी करण्यात आला आहे. या दोन दिवसांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे.

याआधी म्हणजेच १६ ऑगस्ट, तसेच १९ आणि २० ऑगस्ट रोजी “यलो अलर्ट” लागू राहणार असल्याची माहिती आधी देण्यात आली होती. सलग पावसामुळे नद्या-नाले तुडुंब भरण्याची, तसेच खालच्या भागांत पाणी साचण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

हवामान विभागाने मत्स्यव्यवसायिकांना पुढील काही दिवस समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, पर्यटनस्थळांवर मोठ्या संख्येने पर्यटक येत असल्याने प्रशासनाने सर्वांनी सुरक्षिततेचे नियम पाळावेत, धबधबे किंवा नदीकिनारी जाणे टाळावे, अशी सूचना केली आहे.

गोवा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने जिल्हा प्रशासनांना सज्ज राहण्याचे आदेश दिले असून, गावपातळीवरही आपत्कालीन पथके तयार ठेवण्यात आली आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन हवामान विभाग आणि राज्य प्रशासनाने केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Catch Of The Year! शुभमन गिलची भन्नाट कॅच; हवेत उडी घेतली अन्... Video होतोय व्हायरल...

Goa Government Officers: गोव्यातील जलसंपदा अधिकाऱ्यांचा पुणे आणि शिर्डी दौरा चर्चेत; स्वातंत्र्यदिनाच्या अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह

Konkan Special Trains: कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी Good News! गणेशोत्सवात आणखी 16 स्पेशल ट्रेन धावणार, ऑनलाइन बुकिंग सुरू

Crime News: दोन लव्ह अफेयर्स, सात महिन्यांची गर्भधारणा अन् 24 वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू, प्रियकरांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; कानपूर हादरलं

Goa Women Drone Pilot Training: गोव्याच्या ‘ड्रोन दीदी’ सज्ज! 12 महिलांनी घेतले ड्रोन पायलटचे प्रशिक्षण; आता दरवर्षी 100 महिलांना ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT