Yellow Alert In Goa 
गोवा

Yellow Alert In Goa: गोव्यात तीन दिवस यलो अलर्ट, मॉन्सूनची वेगवान प्रगती

Yellow Alert In Goa: मॉन्सूनने केरळनंतर आता तमिळनाडूही व्यापला असून, दक्षिण कर्नाटक आणि आंध्रप्रदेशपर्यंत मजल मारली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Yellow Alert In Goa

गोव्यात आजपासून (03 मे 2024) राज्यात पूर्व मोसमी पावसाचा अंदाज आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिण भागातील जिल्ह्यांसह, पूर्व विदर्भात वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

गोव्यात 03 ते 05 मे या काळात ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याच्या वेधशाळेने वर्तविला आहे. काही भागांमध्ये सकाळी धुकेही पडण्याची शक्यता आहे.

गेल्या चोवीस तासांत गोव्यातील मुरगावात सर्वाधिक 37.8 MM, दाबोळीत 30.8 MM आणि वाळपईत 22.1 MM पावसाची नोंद झाली.

अरबी समुद्रातून प्रवाह वेगवान झाल्याने नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) दक्षिण कर्नाटक, आंध्र प्रदेशासह बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत प्रगती केली आहे.

केरळमध्ये वेळेआधीच दाखल झालेला मॉन्सून यंदा महाराष्ट्रातही लवकर दाखल होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे. त्यामुळे पुढील वाटचालीकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

बंगालच्या उपसागरातील अंदमान-निकोबार बेटसमूह आणि अरबी समुद्रातील मालदीवमध्ये १९ मे रोजी आगमन केल्यानंतर केरळमध्ये दोन दिवस आधीच (ता. ३०) मॉन्सून डेरेदाखल झाला. त्यानंतर उपसागरातील 'रेमल' चक्रीवादळामुळे चाल मिळाल्याने पूर्व भारतात मॉन्सूनची प्रगती सुरूच होती.

रविवारी (ता.२) मॉन्सूनने अरबी समुद्रातून वाटचाल सुरू केली. संपूर्ण केरळ, तमिळनाडू व्यापून वाऱ्यांनी दक्षिण कर्नाटकमधील मंगळुरू, चित्रदुर्ग ते नेल्लूर पर्यंतच्या भागापर्यंत मजल मारली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

एक लॉरी बंद पडली, दुसरी उलटली; जांबोटी - चोर्ला - गोवा मार्गावर रात्रीपासून दोन्ही बाजुची वाहतूक ठप्प

Goa AAP: 'विधानसभेच्या 40 जागा लढवणार'! आतिषींचा पुनरुच्चार; 2027 साठी 'आप'चा स्वबळाकडे कल

Rachol Fort: छत्रपती संभाजी महाराजांनी स्वारी केलेल्या, विवेकानंदानी भेट दिलेल्या गोव्यातील 'या' किल्ल्याचे जतन करा! अभ्यासकांची मागणी

Goa Live Updates: गोव्यात नव्या 'हायस्पीड' बोटी घालणार गस्त

Ration Card: गोव्यातील 350 हून अधिक रेशनकार्ड ‘सरेंडर’! उत्पन्न मर्यादेचा भंग; 103 नवीन कार्ड वितरित

SCROLL FOR NEXT