Rain Alert In Goa Dainik Gomantak
गोवा

Red Alert In Goa: गोमंतकीयांनो काळजी घ्या! पावसाचा जोर आणखी वाढणार, हवामान खत्याकडून रेड अलर्ट जारी

IMD Goa Weather Update: मंगळवारी पेडण्यात सर्वाधिक २०७.४ मी.मी तर, म्हापसा येथे २०२.२ मी.मी पावसाची नोंद झाली.

Pramod Yadav

पणजी: मान्सूनपूर्व पावसाने मंगळवारी गोव्याला झोडपून काढल्यानंतर आज (बुधवारी) राज्याला हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला आहे. गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता असून, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. तसेच, गुरुवारी आणि शुक्रवारी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, या दिवशी देखील मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, २१ आणि २२ म रोजी राज्यात ५० ते ६० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. या काळात दोन्ही जिल्ह्यात (उत्तर आणि दक्षिण) मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

मंगळवारी राज्यात मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाण्याचे लोट वाहू लागले. खोर्ली म्हापसा येथे झालेल्या पावसामुळे दुचाकी चालक पाण्याच्या प्रवाहात वाहत गेल्याचे समोर आले, त्याला वाचविण्यात आले. पण, काही महिलांचा पाण्याच्या मोठ्या प्रवाहापुढे निभाव लागला नाही. तर, काही ठिकाणी झाडे पडल्याची घटना समोर आली. अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला होता. मंगळवारी पेडण्यात सर्वाधिक २०७.४ मी.मी तर, म्हापसा येथे २०२.२ मी.मी पावसाची नोंद झाली.

आठवडाभर पाऊस

या संपूर्ण आठवड्यात राज्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, २४ ते २७ मे या काळात राज्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, हा संपूर्ण आठवडा राज्यात पाऊस सक्रिय राहण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT