Goa : बंगल्‍यासाठी रस्‍ता बांधायला चक्क 'बेकायदेशीर' रित्या डोंगर कापला  Dainik Gomanatk
गोवा

गोव्यात स्वार्थासाठी होतोय पर्यावरणाचा ऱ्हास

स्वार्थासाठी पर्यावरणाचा नाश : टोनी फर्नांडिस यांची वन खात्याकडे तक्रार

दैनिक गोमन्तक

पणजी: सातिस्मोवाडा-ताळगाव येथे बेकायदा डोंगरकापणी करून पर्यावरणाचा नाश केल्याप्रकरणाची तक्रार काँग्रेसचे नेते टोनी फर्नांडिस यांनी आज वन खात्याकडे केली. या प्रकरणाची चौकशी करून त्यात गुंतलेल्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रारीत करण्‍यात आली आहे. डोंगर कापून हा रस्ता कोणत्याही परवान्याशिवाय एका खासगी बांधकामासाठी करण्यात आला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

सांपॉल येथील चर्चकडून आशा महलकडे जाणाऱ्या व सुप्रीमो इमारतीच्या उजव्या बाजूला एक खासगी बांधकाम सुरू आहे. या बांधकामासाठी डोंगर कापून सुमारे 15 मीटरचा रस्ता करण्यात येत आहे. हा रस्ता डोंगरामाथ्यापर्यंत करण्यात आला आहे. या ठिकाणी अलिशान बंगलावजा घराचे काम सुरू आहे. हा रस्ता फक्त या बंगल्यासाठीच करण्यात येत असल्याचा दावा तक्रारदार फर्नांडिस यांनी केला आहे. विशेष म्‍हणजे हे बांधकाम ताळगाव पंचायतीपासून सुमारे 100 मीटर अंतरावर सुरू असताना पंचायतीने डोळे मिटून घेतले आहेत. डोंगरकापणीमुळे तेथे दरड कोसळण्याची तसेच माती खाली येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या भागातील घरांना धोका संभवू शकतो, असेही तक्रारीत म्हटले आहे. दरम्‍यान, वन खात्याकडे तक्रार दाखल करताना टोनी फर्नांडिस यांच्‍यासमवेत माजी महापौर व नगरसेवक उदय मडकईकर तसेच काँग्रेसचे ताळगावचे कार्यकर्ते उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT