Moti Dongor Slum Dainik Gomantak
गोवा

Moti Dongor Slum : मोतीडोंगर झोपडपट्टी; पूर्णतः बेकायदेशीर, तरीही बिनधास्त

ही बेकायदेशीर वस्ती पाडावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल केल्यानंतर पालिका प्रशासन- संचालकानी ही वस्ती पाडण्याचे आश्वासन न्यायालयाला देऊनही ही वस्ती 10 वर्षे उभी आहे.

सुशांत कुंकळयेकर

Moti Dongor Slum : मोती डोंगर हा खरा तर पणजीतील आल्तीनोप्रमाणे सुखवस्तू लोकांच्या राहण्याचा परिसर. एकेकाळी सायंकाळच्या वेळी लोक येथे ताजी हवा खाण्यासाठी येत होते. मात्र आता हा भाग केवळ मडगाव येथेच नव्हे, तर संपूर्ण राज्यात ओळखला जातो, तो तिथे असेलल्या झोपडपट्टीसाठीच. सुमारे 800 घरे आणि सुमारे अडीच ते 3 हजार मते स्वतः जवळ बाळगणारी ही वस्ती तशी पूर्ण बेकायदेशीर आहे.

ही बेकायदेशीर वस्ती पाडावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल केल्यानंतर पालिका प्रशासन- संचालकानी ही वस्ती पाडण्याचे आश्वासन न्यायालयाला देऊनही ही वस्ती 10 वर्षे उभी आहे.

गोवा मुक्तीनंतर झोपड्यांची सुरुवात, राजकीय नेत्यांचा वरदहस्त

1 गोवा मुक्त झाल्यावर आणि सत्तरच्या दशकात गोव्यात व्यापार उदीम वाढल्यावर राज्यांत इतर राज्यातून मोठ्या प्रमाणात परप्रांतीय येऊ लागले. त्याच सुमारास आके कोमुनिदादच्या मालकीच्या या टेकडीवर काही लमाणी जमातीच्या कामगारांनी झोपड्या बांधल्या. हीच या वस्तीची सुरुवात. त्यानंतर कर्नाटक राज्यातून आलेले हमाल आणि भाजीच्या व्यवसायातील कामगारांनी येथे आपल्या झोपड्या उभारल्या.

2 आज ही वस्ती फक्त झोपडपट्टी राहिलेली नसून या वस्तीत एक मंदिर आणि एक मशीदही उभी झाली आहे. लमाणी जमातीचे तारा आणि मुस्लिम समाजाचे मौला हे या वस्तीचे सुरुवातीचे नेते. बाबू नायक हे आमदार असताना त्यांनी या नेत्यांना जवळ करून आपल्या राजकीय कामासाठी त्यांचा वापर सुरू केला.

3 या वस्तीला आपल्या राजकीय ताकदीचा अंदाज आला असे सांगण्यात येते. आज या वस्तीवर सध्याचे आमदार दिगंबर कामत यांचे पूर्ण वर्चस्व आहे. मडगाव पालिकेच्या दोन प्रभागात ही वस्ती वाटून गेली असून आज या दोन्ही प्रभागात कामत जो उमेदवार उभा करतात, तोच निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेघ बनली आहे.

काँग्रेस ते भाजप व पुन्हा ‘व्हाइस वर्सा’

आजपर्यंत या वस्तीने कित्येक आमदारांना पाठिंबा दिला, तरी ही वस्ती अमुकच एका पक्षाची मक्तेदारी असे मात्र कधीच झाले नाही. ज्याची सत्ता त्यालाच पाठिंबा अशी वहिवाट आलेल्या या वस्तीने सुरुवातीला बाबू नायक हे आमदार असताना काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला. त्यानंतर दिगंबर कामत मडगावचे आमदार झाल्यावर ही वस्ती भाजपची झाली. दिगंबर काँग्रेसमध्ये गेल्यावर ती पुन्हा काँग्रेसमय झाली आणि आता दिगंबर बरोबर ती पुन्हा भाजपमय बनली आहे.

गुन्हेगारीची किनार

एकेकाळी मोती डोंगर येथील ही बेकायदा वस्ती येथील गुंडगिरीसाठी कुप्रसिद्ध होती. या वस्तीत बशीर आणि मकबूल यांच्या दोन टोळ्या कार्यरत होते. त्यांनी एकमेकांवर केलेले हल्ले ही या वस्तीतील नित्याची बाब बनली होती. 2008 साली या परिसरात एक तलवारी घेऊन आलेला ट्रक आढळून आल्यावर ही वस्ती पुन्हा चर्चेत आली होती. मात्र आता या वस्तीत अशी कुठलीही गुंडगिरी बाकी राहिलेली नाही, अशी माहिती या वस्तीच्या पायथ्याशी राहणारे पराग रायकर यांनी दिली. आज या वस्तीतील मुले शिकून चांगल्या नोकऱ्या करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT