Illegal Shacks Dainik Gomantak
गोवा

Illegal Shacks: खोला किनारी भागात चालतात बेकायदा शॅक्स

स्थानिकांकडून कारवाईची मागणी: 9 पैकी बीच रिसॉर्ट विनापरवाना

दैनिक गोमन्तक

Illegal Shacks: खोला पंचायत क्षेत्रात पर्यटन नियमांचे उल्लंघन करून पर्यटन हंगाम सुरु होण्यापूर्वीच येथील किनारपट्टीवर पर्यटक अजूनही शॅक सुरु आहेत. संबंधित यंत्रणेने कारवाई करण्याची मागणी या भागातून व्यक्त होत आहे. या ठिकाणी विनापरवाना रिसॉर्ट चालवत असल्याची अनेक प्रकरणे खोला पंचायत क्षेत्रात उघडकीस आली आहेत.

सध्या उपलब्ध माहितीनुसार येथील किनाऱ्यावर सुरु असलेल्या ९ रिसॉर्ट पैकी ६ बीच रिसॉर्ट आजूनही विनापरवाना सुरू असल्याची खात्रीलायक माहिती उपलब्ध झाली आहे. पंचायत व पर्यटन खात्याकडून आवश्यक असलेले परवाने नसताना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गैर व्यवहार चालू आहेत. या पंचायत मधील या गैर व्यवहारात खुद्द काही पंचायत सदस्य गुंतले असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.

गैरव्यवहार रोखण्याची मागणी

९ पंचसदस्य असलेल्या या खोला पंचायतीचे सरपंच अजय पागी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. अजूनही नव्या सरपंचाची निवड झालेली नाही. या ठिकाणी होत असलेल्या गैर व्यवहारात नेमके कोण आणि किती व्यक्ती गुंतल्या आहेत, याचा उलगडा झालेला नाही. सीआरझेड नियमांचे उल्लंघन करणा-यावर कारवाई ची मागणी माजी पंच सदस्य श्रीनिवास नायक व स्थानिकांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT