Ashtami Feri:
Ashtami Feri:Dainik Gomantak

Ashtami Feri: अष्टमी फेरीच्या दुकानवाटपांतून ‘मनपा’ला तब्बल 47 लाखांचा महसूल

अष्टमीची फेरी : दुकानांसाठी अजूनही अर्ज स्वीकारणे सुरूच

महानगरपालिकेला आत्तापर्यंत तीन दिवसांत अष्टमीच्या फेरीच्या दुकानवाटपांतून 47लाख 61 हजारांचा महसूल मिळाला आहे. अर्ज घेऊन गेलेल्या व्यावसायिकांना अजूनही दुकानांचे वाटप सुरू आहे. महानगरपालिकेने मंगळवारपासून अर्ज विक्री सुरू केली. बुधवारपासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली.

Ashtami Feri:
Goa Monsoon Update: राज्यात पाऊस पोहोचला 110 इंचांवर

फेरीला गुरुवारपासून सुरुवात झाली असून, यावर्षी महानगरपालिकेला चांगल्या महसुलाची अपेक्षा आहे. भाडेदरवाढ केल्याने काही नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली असली तरी ज्यांचा या फेरीत चांगला व्यवसाय होतो, त्यांनी तत्काळ अर्ज भरून महापालिकेने ठरविलेली भाडेरक्कम अदा केली आहे.

तीन दिवसांत महानगरपालिकेला चांगला महसूल मिळाला आहे. त्यामुळे अजूनही काही दुकाने दोन दिवसांत व्यावसायिक भाड्याने घेतील, अशी आशा महानगरपालिकेला आहे. शुक्रवारीही काही परराज्यातील व्यावसायिकांनी येऊन दुकाने ताब्यात घेतली.

Ashtami Feri:
Goa Drug Case: गांजाप्रकरणी अटकेतील दीपक रावतला जामीन

गुरूवारी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने फेरीत आलेल्या ग्राहकांची तसेच दुकानदारांचीही तारांबळ उडाली.परिणामी दुकानदारांच्या उलाढालीवरही परिणाम झाल्याचे दिसून आले. आधीच ग्राहक कमी त्यात पावसाची भर पडली.

दुकानदारांना प्रतिसाद थंडा

परराज्यातील व्यावसायिकांचे सध्या कपडे, घरगुती वापराच्या वस्तू विक्रीचे स्टॉल आहेत. तर स्थानिक सुतारकाम करणारे कारागीर पाट-चौरंग, विळी त्याशिवाय इतर लाकडी वस्तू विक्रीसाठी फेरीत आले आहेत. राज्यात इतर शहरांमध्ये असणाऱ्या फर्निचरच्या दुकानदारांचे स्टॉलही येथे आहेत, परंतु सध्या म्हणावी तशी विक्री होत नसून प्रतिसाद थंडा असल्याचे दिसून येत आहे. येणारा ग्राहक वस्तूंची पारख करून जात असल्याचे चित्र आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com