Illegal rent-a-car service Dainik Gomantak
गोवा

Mopa Airport: मोपावर बेकायदेशीर ‘रेंट अ कार’चा सुळसुळाट! स्थानिक टॅक्सीचालक आक्रमक; कडक कारवाईची होतेय मागणी

Mopa Airport Taxi Issue: धारगळ सुकेकुळण हॉटेल परिसरात पेट्रोलपंपजवळ राहून वेगवेगळ्या गावात जाण्यासाठी प्रवाशांना घेऊन भाडी मारत असल्याच्या तक्रारी पुन्हा येऊ लागल्‍या आहेत.

Sameer Panditrao

मोरजी: मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर बेकायदेशीर रेंट अ कार भाडी मारत असल्याचा तक्रारी स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांनी सरकारकडे केल्यानंतर या कारना ‘मोपा’वर निर्बंध घातले होते.

तरीही आता धारगळ सुकेकुळण हॉटेल परिसरात पेट्रोलपंपजवळ राहून वेगवेगळ्या गावात जाण्यासाठी प्रवाशांना घेऊन भाडी मारत असल्याच्या तक्रारी पुन्हा येऊ लागल्‍या आहेत. याबाबत माहिती मिळताच पेडणे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन दोन वाहने पोलिस स्टेशनवर आणली.

मोपा विमानतळासाठी हजारो चौरस मीटर जमीन स्थानिक शेतकऱ्यांनी दिलेली आहे. या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत अपेक्षेनुसार मोबदला मिळालेला नाही. काही बेरोजगार सुशिक्षित युवकांनी टॅक्सीव्यवसाय सुरू केला. निदान या व्यवसायातून तरी समाधानकारक धंदा मिळेल अशी अपेक्षा त्‍यांना होती. परंतु या व्यवसायात देखील बिगरगोमंतकीयांची मोठ्या प्रमाणात स्पर्धा सुरू झाली. सरकारचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.

मागच्या कित्येक महिन्यांपासून मोपा विमानतळावर रेंट कार येऊन प्रवाशांना घेऊन जात असल्याच्या तक्रारी स्थानिक टॅक्सी व्यवसायिकांनी दिल्या होत्या. त्यानंतर वाहतूक खात्याने यावर कारवाई करत त्यांना या ठिकाणी भाडी मारण्यास निर्बंध घातले. परंतु ते थांबणार कुठे? त्यांना सवय झाल्यानंतर कमी पैशाच्या मोबदल्यात रेंट कारने भाडी मारण्याचा धंदा सध्या तेजीत चालवला आहे. हे रेंट कार व्यावसायिक सुकेकुळण-धारगळ येथे पेट्रोलपंपाजवळ आणि हॉटेलच्या परिसरात थांबून प्रवाशांना घेऊन कमी पैशात भाडी मारत असल्याचे दिसून येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

शनि आणि गुरुची चाल करणार मालामाल! नव्या वर्षात खुले होणार उत्पन्नाचे नवे मार्ग, 2026 मध्ये 'या' राशींना मिळणार धनकमाईच्या सुवर्णसंधी

Bodgeshwar Jatra: म्हापशात प्रशासनाचा बडगा! श्री बोडगेश्वर जत्रोत्सवातील जायंट व्हील्ससह 20 राईड्स सील; सुरक्षेच्या कारणास्तव मोठी कारवाई

पिढ्यांमधील अंतर आणि मनाचा समतोल: सुखी म्हातारपणाची गुरुकिल्ली

लग्नाच्या मांडवात राडा! नवऱ्या मुलाला किस करणाऱ्या 'एक्स'ला नवरीनं भर मंडपात धोपटलं; सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल

India Pakistan Nuclear List: तणावाच्या वातावरणातही भारत-पाकिस्तानने जपली 35 वर्षांची परंपरा; अणुयादीच्या देवाणघेवाणीने जगाचे वेधले लक्ष

SCROLL FOR NEXT