Illegal Mobile Tower At Bele Navelim Dainik Gomantak
गोवा

Navelim: बेकायदेशीर टॉवर हटवा; बेले-नावेलीत कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Illegal Mobile Tower At Bele Navelim: हा मोबाईल टॉवर राष्ट्रीय महामार्गाच्या अगदी जवळ उभारण्यात आलेला आहे

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: बेले-नावेली येथील मोबाईल टॉवरची उभारणी ही नियमांची पायमल्ली करून करण्यात आलेली आहे. या टॉवरला यापूर्वीही लोकांनी विरोध केलेला असून लोकांच्या विरोधानंतरही सर्व नियम धाब्यावर बसवून केलेली ही उभारणी बेकायदेशीर आहे. हा टॉवर हटवावा, अशी मागणी प्रतिमा कुतिन्हो यांनी दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली.

यावेळी ग्रामस्‍थ मोठ्या संख्‍येने उपस्‍थित होते. कुतिन्हो यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, हा मोबाईल टॉवर राष्ट्रीय महामार्गाच्या अगदी जवळ उभारण्यात आलेला आहे. त्‍यास नागरिकांचा विरोध आहे. काम सुरू करताना हायमास्ट दिव्याची उभारणी केली जात असल्याचे सांगून लोकांची दिशाभूल करण्यात आली. मात्र, आता सत्‍य बाहेर आले आहे.

नियमांचे उल्लंघन करत उभारणी

या मोबाईल टॉवरची उभारणी ही निवासी घरांपासून दूर होण्याची गरज आहे. त्यासाठी नियम आहेत. संबंधित मोबाईल कंपनीकडून ३१ मीटरच्या अंतरात ३ अँटिना असलेल्या मोबाईल टॉवरची उभारणी करण्यात आली आहे. त्या ठिकाणी केवळ एकाच अँटिनाला परवानगी मिळू शकते.

पण, येथेही नियमांचे उल्लंघन करण्यात आलेले आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करत उभारण्यात आलेल्या या मोबाईल टॉवरवर १५ दिवसांत कारवाई करावी, अशी मागणी दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केलेली आहे, असे कुतिन्हो यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT