Illegal Liquor Seized Dainik Gomantak
गोवा

Illegal Liquor Seized: ट्रॅव्हलमधून करत होते अवैध मद्य वाहतूक; अनमोड अबकारी विभागाने जप्त केला 45 लाखांचा माल

गोव्यातून कर्नाटकात येत असताना बसमधून गोवा निर्मित दारूची बेकायदेशीरपणे तस्करी केली जात होती.

दैनिक गोमन्तक

Illegal Liquor Seized: गोव्यातून होणारी मद्याची अवैध वाहतूक ही गोष्ट आता नवीन राहिली नाही. या घटनांवर आळा घालण्यासाठी गोवा पोलीस, अबकारी खाते नेहमीच सतर्क असते. मिळालेल्या माहितीनुसार, अनमोड अबकारी विभागाने येथील चेकपोस्टवर रात्री मंदारा KA 51 AH 7362 या ट्रॅव्हल बसमधून अवैधरित्या मद्य वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती.

यामुळे त्यांनी ट्रॅव्हल बसची पाहणी केली. त्यावेळी बसमधून 66.750 लिटर गोवा निर्मित दारू आढळली. या प्रकरणी सुप्रीत बी. एच. (सोमनहल्ली) याला अबकारी विभागाने ताब्यात घेतले आहे. त्याचबरोबर दारूच्या बॉटल आणि वाहनासह 45 लाख 57 हजार रुपयांचा माल यावेळी जप्त करण्यात आला आहे.

गोव्यातून कर्नाटकात येत असताना बसमधून गोवा निर्मित दारूची बेकायदेशीरपणे तस्करी केली जात होती.

ही कारवाई अबकारी उपनिरीक्षक श्रीकांत असुदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी अधिकारी एस बी बनमोडे, एस डी राठोड, इन जी जोगळेकर, पोलीस अधिकारी तनोज बैलोर, ललिता हल्ली, राहुल एस एस टी विभागाचे राहुल कलमणकर आदी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

Goa Assembly Session: गोवा विधानसभेचा 'खेळखंडोबा'! सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात राज्याच्या भवितव्याचा विसर

Dabolim Dubai Flight: दाबोळी-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार, दररोज एक उड्डाण; मुंबई-गोवा मार्गावरही दिवसाला 8 फेऱ्या

Goa Tourist Death: आठ महिन्यांत गोव्यात 56 पर्यटकांचा मृत्यू! 4 पर्यटकांचे खून; 14 जणांचा बुडून मृत्यू, तर 10 जणांची आत्महत्या

SCROLL FOR NEXT