Pernem Police Dainik Gomantak
गोवा

नयबाग येथे बेकायदेशीर दारू जप्त; पेडणे पोलिसांची कारवाई

नयबाग येथे आज सकाळी पेडणे पोलिसांनी एका कारची झडती घेउन 30,000 रुपये किंमतीची बेकायदेशीर दारु जप्त केली.

दैनिक गोमन्तक

पेडणे : नयबाग येथे आज सकाळी पेडणे पोलिसांनी एका कारची झडती घेउन 30,000 रुपये किंमतीची बेकायदेशीर दारु जप्त केली. पेडणे पोलीस याबाजूने जात असता कारचा संशय आल्याने त्यांनी ही कार थांबवून तपासणी केली असता त्यात दारुचे खोके दिसले.

पोलिसांनी आवश्यक कागदपत्रांची मागणी केली असता चालक ती सादर करु शकले नाहीत. या कारमध्ये व्हिस्की, ब्रॅंडी व रम या प्रकारची दारू जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी एम एच 04 - 9235 या क्रमांकाच्या कारसह दारु चालक रोहित साळगावकर (सावंतवाडी) याला ताब्यात घेउन पेडणे अबकारी कार्यालयाच्या ताब्यात दिले.

पेडणे पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्ताराम राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक विवेक हळर्णकर, कॉस्टेबल योगेश गावकर, चालक विनोद नाईक, विन्सी डायस यांनी ही कारवाई केली. पेडणे अबकारी कार्यालयाचे अधिकारी शेटये हे याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सुरांचा ताल की संकटांचा काळ? गोव्यात नाताळच्या हंगामात संगीतकारांची मोठी ओढाताण

Goa Opinion: लईराई जत्रेतील चेंगराचेंगरी, नाईटक्लबमधील 25 मृत्यू; यंत्रणांच्या उत्तरदायित्वाची निश्चिती ही काळाची गरज

Christmas 2025: रंगीबेरंगी दिवे, मोठे ख्रिसमस ट्री! राज्यात नाताळ सणाची तयारी जोरात; रस्ते, बाजारपेठा सजावटीने उजळल्या

अग्रलेख: पक्ष-अपक्ष जिंकतील, लोक हरतील!

Manohar Parrikar: 'मनोहर पर्रीकर हे निर्भीड, धुरंधर, द्रष्टे राजकीय नेते'! बायणा रवींद्र भवनमध्ये जयंती साजरी; भाईंच्या आठवणींना उजाळा

SCROLL FOR NEXT