Illegal Liquor in Goa Dainik Gomantak
गोवा

Illegal Liquor in Goa: ‘सिंग लिकर’च्या मालक, चालकाला ‘शो-कॉज’; अबकारी खात्याची कारवाई

२३ रोजी सुनावणी

दैनिक गोमन्तक

Illegal Liquor in Goa: कळंगुट येथील ‘सिंग लिकर’ मद्यालयावर बनावट मद्यविक्रीप्रकरणी फरिदाबाद पोलिसांनी कारवाई करण्यापूर्वी अबकारी खात्याने त्याच्याविरुद्ध कारवाई केली होती. या मद्यालयाचा परवानाधारक मालक कैलाश साखळकर तसेच हे मद्यालय भाडेतत्वावर चालवणारा मनिंदर सिंग या दोघानांही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटिशीवर खात्यासमोर २३ मे रोजी सुनावणी होणार आहे.

हरियाणास्थित मनिंदर सिंगकडे मद्यविक्रीसाठी वाहतूक परवाना नसल्याची माहिती मिळाली होती. त्याआधारे अबकारी पथकाने मार्चमध्ये या मद्यालयावर छापा टाकून सुमारे २३ विदेशी बनावटीच्या मद्य बाटल्या जप्त केल्या होत्या. त्याची किंमत सुमारे ५६ हजार रुपये होती. या कारवाईत खात्याने मालक व चालकाला एप्रिलमध्ये नोटीस बजावली होती. ही सुनावणी आता मे मध्ये ठेवली आहे. ज्यावेळी खात्याने कारवाई केली तेव्हा पाच कर्मचारी मद्यालयात होते, अशी माहिती अबकारी आयुक्त नारायण गाड यांनी दिली.

मनिंदर सिंगला बनावट मद्यविक्री रॅकेटमध्ये काही दिवसांपूर्वी फरिदाबाद पोलिसांनी अटक केली आहे. गोवा अबकारी खात्याने त्याच्याविरुद्ध वाहतूक परवाना नसल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे. या कारवाईत जप्त बाटल्यांचीही तपासणी होत आहे. सुनावणीनंतर या सिंग लिकर मद्यालयावर कायद्यानुसार योग्य ती कारवाई होऊ शकते,असे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

दरम्यान, हल्लीच पत्रादेवी येथे अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांनी २३ लाखांचा दारूसाठा जप्त केला होता. हा साठा ट्रकमधून नेला जात होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT