Vasco illegal LED fishing Dainik Gomantak
गोवा

illegal LED fishing: वास्कोत बेकायदेशीर 'एलईडी' मासेमारीचा पर्दाफाश; मत्स्यव्यवसाय विभागाकडून तीन बोटी जप्त

Vasco illegal LED fishing: गोव्याच्या किनारपट्टीवर बंदी असतानाही सुरू असलेल्या बेकायदेशीर एलईडी (LED) मासेमारीवर प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे.

Sameer Amunekar

वास्को: गोव्याच्या किनारपट्टीवर बंदी असतानाही सुरू असलेल्या बेकायदेशीर एलईडी (LED) मासेमारीवर प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. वास्को येथील खोल समुद्रात मत्स्यव्यवसाय विभागाने किनारपट्टी पोलिसांच्या मदतीने शोधमोहीम राबवून तीन मासेमारी बोटींना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, समुद्रातील जैवविविधतेला धोका निर्माण करणाऱ्या या प्रकाराला आळा घालण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, समुद्रात एलईडी दिव्यांचा वापर करून मोठ्या प्रमाणावर मासेमारी केली जात असल्याच्या तक्रारी गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाकडे येत होत्या. या तक्रारींची दखल घेऊन तटरक्षक दल, सागरी पोलीस आणि मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी एक संयुक्त मोहीम आखली.

वास्कोच्या खोल समुद्रात गस्त घालत असताना, तीन संशयास्पद बोटी आढळून आल्या. तपासणी केली असता, या बोटींवर बंदी असलेले एलईडी दिवे आणि जनरेटरचा वापर मासेमारीसाठी केला जात असल्याचे उघड झाले.

वास्को, बेतुल आणि पणजी येथील बोटींचा समावेश

जप्त करण्यात आलेल्या या तीन बोटींपैकी एक वास्को, दुसरी बेतुल आणि तिसरी पणजी येथील असल्याची माहिती समोर आली आहे. या बोटींवरून मोठ्या प्रमाणात एलईडी उपकरणे आणि मासेमारीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

मासेमारीसाठी अशा दिव्यांचा वापर केल्याने लहान माशांच्या प्रजननावर आणि सागरी पर्यावरणावर विपरीत परिणाम होतो, म्हणूनच केंद्र आणि राज्य सरकारने यावर कडक बंदी घातली आहे.

कठोर कारवाईचे संकेत

मत्स्यव्यवसाय विभागाने या तिन्ही बोटी ताब्यात घेतल्या असून पुढील चौकशी सुरू केली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या बोटींचे परवाने रद्द करण्याबाबत आणि संबंधित मालकांवर मोठा दंड आकारण्याबाबत विचार सुरू आहे. "सागरी साधनसंपत्तीचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे आणि बेकायदेशीर मासेमारी कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही," असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: "चिमुकल्यांचे हात-पाय बांधून अमानुष छळ!" डेकेअर सेंटरचा संतापजनक व्हिडिओ व्हायरल; पोलिसांनी 13 जणांना ठोकल्या बेड्या

Goa Professional League 2026: स्पोर्टिंग क्लब द गोवाचा 'विराट' विजय! डॉयल अल्विसची शानदार हॅटट्रिक अन् प्रोफेशनल लीगच्या जेतेपदावर तिसऱ्यांदा कोरलं नाव

Goa River Drowning Cases: गोव्यात बेफिकिरीमुळेच बुडण्याच्या घटनांमध्‍ये होतेय वाढ! सत्तरी तालुक्‍यातही चिंता; मद्यसेवन, सुरक्षेअभावी नद्या बनल्‍या धोकादायक

Harmal Wedding Theft : वीज पुरवठा थांबवून मारला डल्ला, लग्नसोहळ्यातील लुटीचा पडद्याआडून खेळ तपासाचे आव्हान

Bicholim Class 11 Admissions : अकरावीच्या प्रवेशासाठी धावपळ, विज्ञान शाखेसाठी चुरस; ‘ऑनलाईन’ प्रवेश प्रक्रिया सुरू

SCROLL FOR NEXT