Quepem News Dainik Gomantak
गोवा

बेकायदेशीर चिरेखाणीत अडकला ट्रक

चिरे काढून झाल्यानंतर त्या खाणी बुजवत नसल्याने समस्या उद्भवल्याचं स्थानिकांचे मत

दैनिक गोमन्तक

केपे : मिराबाग सावर्डे येथे बऱ्याच बेकायदेशीर चिरे काढण्याचा व्यवसाय चालतो या साठी कोणती ही शासकिय यंत्रणा, पर्यावरण विभाग यांची परवानगी नाही. केवळ व्यक्तीगत अर्थिक हीताने काही व्यक्ती यासाठी असे मार्ग अवलंबत आहेत. या पार्श्वभूमीवर आज दुपारी चिरे नेण्यासाठी आलेला ट्रक चिरे भरताना अचानक पाणी आल्याने पाण्याखाली गेला. ( Illegal laterite stone truck stuck Mirabagh Sanvordem )

प्राप्त माहितीनुसार मिराबाग येथे बरेच लोक चिरे मारण्याचा व्यवसाय करतात. पण चिरे काढून झाल्यानंतर त्या खाणी बुजवत नसल्याने असे खड्डे मोठ्या प्रमाणात तसेच सोडले जात आहे. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात पाणी भरून वाहते आहे. आज दुपारी एका खणीवर ट्रकमध्ये चिरे भरण्याचे काम सुरू असताना सदर खाणीच्या बाजूस असलेल्या चिरे खाणीतील पाणी अचानकपणे ट्रक असलेल्या खाणीत आल्याने ट्रक पाण्याखाली गेला तर चिरे भरणारे कामगारांनी तेथून पळ काढला तर दोन कामगार वरती अडकून पडले नंतर त्यांना बाहेर काढण्यात आले.

प्रियोळ येथील मुख्य रस्त्यावर दरड कोसळली; पणजी-फोंडा मार्गावरील वाहतूक ठप्प

मागील 2 दिवसात गोव्यामध्ये मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी पाणी भरणे, पडझड तसेच दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. आता कोने, प्रियोळ येथील मुख्य रस्त्यावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाचे कर्मचारी दाखल झाले आहेत. पण या घटनेमुळे पणजी - फोंडा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

आगोंद व खोला पंचायत क्षेत्राला जोडणाऱ्या साळेरी पुलाजवळ यंदा पुन्हा दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुलाच्या आगोंद बाजूला रस्त्याच्या दोन्ही बाजूंकडील डोंगराची दरड कोसळून दगड व माती रस्त्यावर आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hardik Pandya Video: हार्दिकच्या धडाकेबाज खेळीवर गर्लफ्रेंड फिदा! सोशल मीडियावर रंगली 'फ्लाइंग किस'ची चर्चा; मैदानावरच प्रेमाचा वर्षाव

IND vs SA 5th T20: अहमदाबादमध्ये हार्दिक पांड्याचं वादळ, 16 चेंडूत ठोकलं अर्धशतक; अभिषेक शर्माचा मोडला रेकॉर्ड VIDEO

..तांबडया समुद्रातून बेट मागे टाकल्यावर बोट 'सुएझ कालव्या'त शिरली! गोव्यासाठी लढलेल्या वीरांच्या कारावासातल्या भयाण आठवणी

U19 Asia Cup 2025: भारताचा श्रीलंकेला विजयाचा 'धोबीपछाड'; फायनलमध्ये रंगणार भारत-पाक हायव्होल्टेज थरार! VIDEO

Rahu Gemstone: राहुची महादशा अन् गोमेद रत्नाचा चमत्कार! 'या' 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार; जाणून घ्या फायदे आणि महत्त्वाचे नियम

SCROLL FOR NEXT