Taleigao Illegal Construction Dainik Gomantak
गोवा

Taleigao: ताळगावात बेकायदेशीर भराव, बांधकाम उभारण्याचे काम! तक्रार देऊनही खात्याचे दुर्लक्ष; फौजदारी दाखल करण्याची मागणी

Taleigao Illegal Construction: भरारी पथकाकडे आणि उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे औपचारिक तक्रारी दाखल होऊन वीस दिवस झाले. त्याची सरकारकडून दखल घेतली जात नाही.

Sameer Panditrao

पणजी: ताळगावातील सेंट मायकल चर्चच्या मागील बाजूस असलेल्या भातशेतीतील सर्व्हे क्रमांक १८६ मध्ये बेकायदेशीरपणे भराव टाकण्याचे व बांधकाम उभारण्याचे काम चालू आहे. या कामाविषयी तक्रार देऊनही महसूल खात्याकडून दखल घेतली जात नाही. त्याविषयी आता न्यायालयात दाद मागितली जाईल, अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्या सिसील रॉड्रिग्स आणि फ्रान्सिस कुएल्हो यांनी दिली.

कुएल्हो म्हणाले, ज्या सर्व्हे क्रमांकाच्या जमिनीत भराव टाकला जात आहे आणि बांधकाम उभारले जात आहे, त्याचा विक्री व्यवहार १९९९ मध्ये झाला होता. त्या व्यक्तीचे आत्ताचे वय पाहता ती व्यक्ती त्या वर्षांत बालवयात होती, त्यामुळे त्या वयात विक्री व्यवहार कसा झाला, असा सवाल त्यांनी केला.

भरारी पथकाकडे आणि उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे औपचारिक तक्रारी दाखल होऊन वीस दिवस झाले. त्याची सरकारकडून दखल घेतली जात नाही. महसूल विभाग, मुख्य सचिव आणि कृषी विभागाने या विनाशाकडे डोळेझाक केली आहे. ताळगावच्या पंच सदस्यास बेकायदेशीर भराव टाकत असताना रंगेहाथ पकडले गेले. परंतु त्याने नंतर तेथून पळ काढला.

दरम्यान, सिसिल म्हणाल्या, पंचायत सदस्याने घटनास्थळी अपराध कबूल केल्याने हा बेकायदेशीरपणा असल्याचे सिद्ध झाले आहे. तरीही, सरकारची निष्क्रियता संगनमत दर्शवते. सर्व्हे क्रमांक १८६/३ मधील बेकायदेशीर बांधकामाची जमीन येथील मंत्र्यांच्या मुलाच्या नावे आहे. सर्व्हे क्रमांक १८६ मधील सर्व बेकायदेशीर भराव आणि बांधकाम उभारणी तात्काळ थांबवे, फसवणूक, जमीन हडप आणि पर्यावरणाचे नुकसान केल्याबद्दल संबंधितांवर फौजदारी खटला दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT