Taleigao: दार वाजवले, हाका मारल्या; दरवाजा तोडल्यावर दिसला कुजलेला मृतदेह, तामिळनाडूच्या डॉक्टरचा ताळगाव येथे संशयास्पद मृत्यू

Taleigao Doctor Death: ताळगाव येथील ‘अप्सरा मंझिल’ या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये भाडेपट्टीवर एकटाच राहत होता. त्याचे कुटुंब तामिळनाडू येथे आहे.
Death
DeathDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: बरभाट - ताळगाव येथील इमारतीच्या फ्लॅटमध्ये तामिळनाडूच्या ६० वर्षीय फ्रँकलिन डायस या डॉक्टराचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला आहे. पणजी पोलिसांनी याप्रकरणी पंचनामा करून मृतदेह गोमेकॉ इस्पितळ शवागारात पाठवला आहे.

अनैसर्गिक मृत्यूची नोंद करून पोलिसांनी त्याच्या कुटुंबियाशी तामिळनाडूमध्ये संपर्क साधला आहे. त्याचा मृत्यू ह्रदयविकाराने झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी माहिती पोलिस निरीक्षक विजय चोडणकर यांनी दिली.

ताळगाव येथील ‘अप्सरा मंझिल’ या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये भाडेपट्टीवर एकटाच राहत होता. त्याचे कुटुंब तामिळनाडू येथे आहे. या इमारतीत शेजारी राहणाऱ्या फ्लॅटधारकांना कुजलेला वास येऊ लागल्याने त्याची माहिती पणजी पोलिसांना देण्यात आली. पोलिस घटनास्थळी पोहचले तेव्हा फ्लॅटचे दार आतून बंद होते.

Death
Quepem Crime: प्रेयसी प्रतारणा करते, शंकेने केला खुनी हल्ला; गोव्यातून गाठली रत्नागिरी, संशयिताला सांगलीतून घेतले ताब्यात

दार उघडण्यासाठी पोलिसांनी डॉक्टराला हाका मारल्या तसेच दारावर जोरजोराने आवाज दिला. मात्र, कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने ते दार तोडण्यात आले. फ्लॅटमध्ये आत गेल्यावर डॉक्टरचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत बिछान्यावर होता. पोलिसांनी खोलीची तपासणी केली असता कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. पंचनामा करून तो गोमेकॉ इस्पितळात पाठवण्यात आला.

Death
Goa Crime: रागाच्या भरात पत्नीचा केला खून, 3 वर्षाच्या मुलाला घेऊन पळाला; झारखंडच्या व्यक्तीला न्यायालयाने ठरवले दोषी

गेल्या काही दिवसांपासून डॉ. फ्रँकलिन डायस फ्लॅटच्या बाहेर पडला नव्हता. त्यामुळे तो आतमध्ये आहे की नाही याचीही माहिती शेजारील फ्लॅटधारकांना नव्हती. फ्लॅटमधून आज कुजलेला वास येऊ लागल्याने हा प्रकार उघडकीस आला. डॉक्टराला झोपेतच ह्रदयविकाराचा झटका आला व त्यातच त्याचा मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे. त्याचे कुटुंबीय गोव्यात पोहचल्यावर शवचिकित्सा केली जाणार आहे. त्यानंतरच त्यांच्या मृत्यूचा उलगडा होईल, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com