supermarket dainik gomantak
गोवा

उत्पादक आणि निर्यातदाराचे नाव नसताना विकल्या जाणाऱ्या वस्तू जप्त

वजन व माप खात्याची मडगाव आणि जवळपासच्या पाच दुकानांवर कारवाई

दैनिक गोमन्तक

मडगाव : उत्पादकांचे नाव नाही, निर्यातदाराचे नाव नाही, मालाची व्यवस्थित किंमत लिहिलेली नाही, उत्पादन तारीख नाही. अशा प्रकारे सर्व नियम धाब्यावर बसवून मडगाव व जवळपासच्या भागात सुपर स्टोअर्समध्ये विकला जाणारा माल आज वजन व माप खात्याने एका कारवाईत जप्त केला. आज जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त ही कारवाई करण्यात आली. (Illegal items sold in supermarkets around Madgaon were seized)

मडगाव (Margao) येथील विशाल मेगा मार्टसह एकूण पाच बड्या स्टोअर्सवर कारवाई करून हा माल जप्त करण्यात आला. किमान 100 वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आणि वस्तू जप्त करण्यात आल्याची माहिती या खात्याचे दक्षिण गोव्याचे उप नियंत्रक नितीन पुरुशन यांनी दिली.

यात मडगाव (Margao) तसेच कोलव्यातील स्टोर्सचा समावेश होता. या स्टोअर्समध्ये कित्येक दुसऱ्या देशातून आयात केलेल्या वस्तू ज्यात विशेषतः चॉकलेट्स (Chocolates) व सिगारेट्सचा (Cigarettes) समावेश होता.

मात्र या उत्पादनावर उत्पादनाची तारीख, उत्पादकाचे नाव, या वस्तू कुठल्या देशातून आयात करण्यात आल्या. त्या आयातदाराचे (Import) नाव अशी कोणतीही माहिती नव्हती. वजन व माप खात्याच्या नियमानुसार अशा वस्तू विकताना ही सारी माहिती नमूद करणे आवश्यक असते अशी माहिती पुरुशन यांनी दिली.

या संबंधी गोवा कॅन (Goa Can) या ग्राहक हक्का संबंधी लढणाऱ्या संघटनेने तक्रार केली होती. कोलवा येथील इकबालस या स्टोअर्सवरही छापा मारून वस्तू पकडल्या अशी माहिती गोवा कॅनने दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT