Goan Residents USA Deportation Dainik Gomantak
गोवा

USA Deportation: गोव्याचे युवक धोका पत्करून अमेरिकेला का जातात? आम आदमी पक्षाच्या आमदारचा सवाल

Goan Passangers deportation USA: अमेरिकेत बेकायदेशीररित्या स्थलांतरित झालेल्या ११९ भारतीयांना निर्वासित ठरविल्यानंतर त्यांना मायदेशात पाठविण्यात आले.

गोमन्तक डिजिटल टीम

Indian immigrants deported from the USA arrive in Goa

पणजी : अमेरिकेत बेकायदेशीररित्या स्थलांतरित झालेल्या ११९ भारतीयांना निर्वासित ठरविल्यानंतर त्यांना मायदेशात पाठविण्यात आले. त्यात गोव्यातील दोघांचा समावेश असून, त्या दोघांना रविवारी दुपारी दाबोळी विमानतळावर उतरविण्यात आल्याची माहिती अनिवासी भारतीय आयोगाचे आयुक्त ॲड. नरेंद्र सावईकर यांनी दिली.

अमेरिकेने तेथे बेकायदेशीर वास्तव्य करून राहणाऱ्या भारतीयांना परत पाठविण्यास सुरुवात केली असून काल (शनिवारी) ‘सी-१७’ या विमानाने पाठविलेली दुसरी तुकडी परत आली. अमेरिकेहून ११९ भारतीयांना घेऊन आलेले विमान शुक्रवारी रात्री अमृतसर येथे दाखल झाले.

त्याठिकाणी कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर त्यांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात आले. गोव्यामधील दोघांना आज दुपारी दाबोळी विमानतळावर उतरविण्यात आले. मात्र, त्यांच्याविषयी अधिक माहिती देण्याचे सावईकर यांनी टाळले.

सावईकर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, नोकरी-व्यवसायानिमित्त विदेशामध्ये जाणाऱ्या नागरिकांनी तेथील कायदे-नियमांचा आदर केला पाहिजे. परदेशात प्रवास करताना कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी. त्यामुळे अधिक तपशीलासाठी दोन्ही देशांच्या प्रशासनाला संपर्क साधणे सोपे होईल.

प्रवासादरम्यान ज्यांना मदतीची गरज आहे, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘एनआरआय’ आयोग नेहमीच कार्यरत राहील, असेही त्यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, ११९ भारतीय नागरिकांना काल मायदेशी पाठविण्यात आले. यापैकी ६७ पंजाबचे, ३३ हरियाणा, ८ गुजरात, ३ उत्तर प्रदेश, २ राजस्थान, २ महाराष्ट्र, २ गोवा आणि प्रत्येकी एक हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरचे आहेत.

एजंटांवर विश्‍वास नको!

एजंटांमार्फत परदेशात नोकरीच्या संधी शोधत असलेल्या गोमंतकीयांनी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी कृपया सर्व तपशीलाची तसेच कागदपत्रांची काळजीपूर्वक पडताळणी करावी, असे आवाहन ॲड. सावईकर यांनी केले. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्यांवर कारवाई सुरू केली असून त्याचाच हा एक भाग आहे. ११९ भारतीयांची दुसरी तुकडी शुक्रवारी अमृतसरमध्ये अाली.

प्रशासनाकडून परतीची चोख व्यवस्था

अमेरिकेतून हद्दपार केलेल्या गोव्यातील दोन नागरिकांच्या परतीची प्रक्रिया सुकर करण्यासाठी प्रशासनाकडून सोय करण्यात आली होती. त्यांच्या सुरक्षित प्रवासाची पूर्ण जबाबदारी घेत, आवश्यक ती सर्व व्यवस्था प्रशासनाने केली होती. इतर राज्यातील नागरिकांनाही त्यांच्या मूळ राज्यांमध्ये सुरक्षित पोहोचविण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या होत्या.

सरकारनेही विचार करावा : क्रूझ सिल्वा  

आमचे युवक धोका पत्करून अमेरिकेला का जातात, याचा विचार सरकारने करण्याची गरज आहे.  मी लवकरच मुख्यमंत्री डॉ.  प्रमोद सावंत तसेच अनिवासी भारतीय आयोगाचे आयुक्त ॲड. नरेंद्र सावईकर यांच्याशी याबाबत चर्चा करणार आहे, असे ‘ट्विट’ वेळ्ळीचे ‘आप’चे आमदार क्रूझ सिल्वा यांनी केले आहे.

‘ते’ दोघे शिरोडा, चिंचिणीचे रहिवासी

अमेरिकेत बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या दोन गोमंतकीय नागरिकांना आज प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेत सुखरूप त्यांच्या घरी पोचविले. अमेरिकेतील स्थलांतर नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांना मायदेशी पाठविण्यात आले आहे. अडविसेंट रिक्सन क्लिप्सन मास्कारेन्हास (रा. चिंचिणी) आणि ग्लॅडसन पेलांग सोझा (रा. शिरोडा) अशी त्यांची नावे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

SCROLL FOR NEXT