illegal Hoardings Dainik Gomantak
गोवा

Margao : मडगावात बेकायदा होर्डिंग्स; कामतांचा निषेध

शॅडो कौन्सिलची तक्रार; कुतिन्हो यांनी नगरपालिकेला केली यादी सादर

गोमन्तक डिजिटल टीम

शॅडो कौन्सिल फॉर मडगावने (एससीएम) मडगावचे आमदार दिगंबर कामत आणि त्यांच्या नगरसेवकांचा मडगावमध्ये बेकायदेशीरपणे बॅनर, होर्डिंग उभारल्याबद्दल निषेध केला. यात उच्च न्यायालय आणि महापालिका प्रशासन संचालनालय यांच्या निर्देशांचे हे उल्लंघन असल्याचे सावियो कुतिन्हो म्हणाले.

मडगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात नोव्हेंबरमध्ये शॅडो कौन्सिल फॉर मडगावने दिवाळीच्या सणात उभारलेल्या बॅनर, होर्डिंगची यादी पालिकेला सादर केली होती. या सणामध्ये नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात लावलेल्या होर्डिंग्स आणि बॅनरविषयी महसूल वसूल करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नसल्याचे म्हटले होते.

आता ख्रिसमस व नवीन वर्षासाठी पालिका क्षेत्रात आमदार आणि नगरसेवक यांच्याकडून शुभेच्छांचे नवीन बॅनर, होर्डिंग्ज पुन्हा लावले आहेत. उच्च न्यायालयातील याचिकेच्या अनुषंगाने होर्डिंग्ज व बॅनर लावण्यावर बंदी असतानाही या राजकारण्यांनी आदेशाचे उल्लंघन केले आहे, असे ते म्हणाले. आमदार दिगंबर कामत यांचे ख्रिसमसच्या शुभेच्छा असलेले हे होर्डिंग मडगावमध्ये लावले आहेत. याविषयी त्यांनी परवानगी घेतली आहे का, याची पडताळणी होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT