Sunil Kavthankar Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: मुख्यमंत्री सावंत यांचे सरकार मृत झाले आहे; डोंगरकापणीवरुन काँग्रेसचा हल्लाबोल

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्यातील बेकायदेशीर डोंगरकापणी खपवून घेतली जाणार नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नुकतेच जाहीर केले. तरीही हे प्रकार थांबलेले नाहीत. धारबांदोडा येथे मोठ्या प्रमाणात डोंगर कापणी होत असल्याच्या प्रकाराने प्रशासन खडबडून जागे झाल्याचा आरोप काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांनी केला. काँग्रेस भवनात मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

डोंगर कापण्याचे प्रकार तपासण्याची जबाबदारी तलाठ्यांवर सोपवली आहे. केवळ तलाठ्यांवर ही जबाबदारी न सोपवता ती मामलेदार, उपजिल्हाधिकारी, पोलिस अधिकारी यांनाही द्यावी. प्रतापनगर, धुलैय येथे डोंगर कापणीचा प्रकार पुढे आला आहे.

रेईशमागूसचा डोंगर बिल्डरने साफ केला, हे हरितपट्ट्याचे नुकसान नाही तर काय आहे, असा सवाल कवठणकर यांनी केला. बेकायदेशीर डोंगर कापणी ही राज्यासाठी हानिकारक आहे. मुख्यमंत्री सावंत यांचे सरकार मृत झाले आहे, असा आरोप कवठणकर यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: पिराचीकोंड-डिचोली येथील बेकायदेशीर झोपडपट्टी हटविण्यास सुरुवात, परिसरात तणाव

Ganthvol: गोव्याच्या प्रेरणादायी विद्यार्थी चळवळीचा इतिहास ‘गांठवल’मधून उलगडणार

Bastora Crime: 'अंगावरील दागिने सांभाळा..' अशी बतावणी करत तोतया सीबीआय पोलिसांचा दागिन्यांवर डल्ला

Colva Crime: कोलव्‍यात पुन्हा राडा! पार्टीतील वादातून लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण; अर्धमेल्‍या युवकाला बाणावलीत सोडले

हॉटेलमध्ये झाली मैत्री, लग्नाचे आमिष देऊन केला लैंगिक अत्याचार; गोव्याच्या तरुणाला छत्तीसगड येथे अटक

SCROLL FOR NEXT