Venzy Viegas  Dainik Gomantak
गोवा

Darbandora Hill Cutting: ...बेकायदा डोंगरकापणी आणि झाडांची कत्तल गंभीर विषय, CM ने भूमिका स्पष्ट करावी; आमदार व्हिएगस

MLA Venzy Viegas: धारबांदोडा येथील या उघड्या बोडक्या डोंगराला आमदार व्‍हिएगस यांनी आज बुधवारी भेट देऊन पाहणी केली.

गोमन्तक डिजिटल टीम

धारबांदोड्यातील बेकायदा डोंगरकापणी आणि झाडांच्या कत्तलीचा विषय गंभीर आहे. मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत डोंगरकापणीला तलाठी तसेच संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल असे जाहीर केले होते. तर, नगरनियोजन खात्‍याचे मंत्री विश्‍वजीत राणे यांनी डोंगरकापणी करणाऱ्याला २५ लाखांचा दंड केला जाईल, अशी घोषणा केली आहे. मात्र धारबांदोड्यातील हे प्रकरण त्‍यांना आव्हान देणारे ठरले आहे. त्‍यांनी भूमिका स्‍पष्‍ट करावी, अशी मागणी आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी केली.

धारबांदोडा येथील या उघड्या बोडक्या डोंगराला आमदार व्‍हिएगस यांनी आज बुधवारी भेट देऊन पाहणी केली. भाजप सरकार या प्रकरणी गप्प राहिल्यास अशा दुष्कृत्यांना त्यांचा पाठिंबा आहे असे लोकच समजतील, असेही ते म्हणाले. तर, काँग्रेस पक्षाच्या उसगावच्या कार्यकर्त्या तथा पंचसदस्य मनीषा उसगावकर यांनीही डोंगरकापणी आणि झाडांच्या कत्तलीविषयी तीव्र संताप व्यक्त करताना सदर कृत्‍य उघडकीस आणणाऱ्या वार्ताहराच्या पत्नीची बदली करून अशा बेकायदा गोष्‍टींना सरकारी यंत्रणा पाठीशी घालत असल्याचा आरोप केला.

ताबडतोब ‘नो डेव्हलपमेंट झोन’ जाहीर करा

सरकारने आता आपल्या म्हणण्याप्रमाणे हा कापणी केलेला डोंगर ‘नो डेव्हलपमेंट झोन'' जाहीर करण्याची जोरदार मागणी आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी केली. आताच कारवाई करण्याची खरी गरज आहे, तरच सरकार जे बोलते ते करते असा विश्‍वास लोकांना वाटेल. अन्यथा अशा बेकायदा कृत्‍यांत सरकारचा हात आहे, असे लोक समजतील. गोव्याच्‍या पर्यावरणाचे रक्षण करण्याची आज खरी गरज आहे. पण काही लोक ‘आपण मुख्यमंत्र्यांचा माणूस आहे’ असे जाहीरपणे सांगून अशी कृत्ये करतात. त्यामुळे अशा गोष्टींवर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे. आम आदमी पक्ष आता गप्प बसणार नाही, राज्‍यातील डोंगरकापणीविरोधात आवाज उठवेल, असा इशाराही त्‍यांनी दिला.

ही ‘बदली’ नव्‍हे तर ‘बदला’!

ज्या वार्ताहराने या डोंगरकापणीची बातमी केली, त्या वार्ताहराच्या पत्नीची बदली करण्यात आली आहे. दै. ‘गोमन्तक’चे वार्ताहर एकनाथ खेडेकर यांची पत्नी गृहरक्षक दलात आहे. तिची बदली ताबडतोब कुळेहून मडगावला करण्यात आली. ही बदली नव्हे तर ‘बदला‘ आहे. यावरून कुणी आवाज उठवायचा नाही, असे सरकारला वाटते काय? असा सवाल करून ही बदली त्‍वरित रद्द करा आणि सरकार पर्यावरण रक्षणाला प्राधान्‍य देत असल्‍याचे स्पष्ट करा, असे आव्‍हान आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT