Mandrem Hill Cutting: 'मांद्रेतील डोंगरकापणी पर्रीकर यांच्या काळातील'; नगर नियोजन खात्याच्या नोटीसवर ढवळीकर स्पष्टच बोलले

Minister Sudin Dhavalikar: ढवळीकर म्हणाले, आताच काही डोंगर कापणी केलेली नाही. वीज उपकेंद्र स्व. मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्री असताना उभारण्यात आले होते.
Mandrem Hill Cutting: 'मांद्रेतील डोंगरकापणी पर्रीकर यांच्या काळातील'; नगर नियोजन खात्याच्या नोटीस ढवळीकर स्पष्टच बोलले
Sudin DhavalikarDainik Gomantak
Published on
Updated on

मांद्रे येथे वीज उपकेंद्रासाठी डोंगर कापणी केल्याप्रकरणी वीज खात्याला नगर नियोजन खात्याने बजावलेल्या नोटीशीला आपण फारशी किंमत देत नसल्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दाखवून दिले. ढवळीकर म्हणाले, आताच काही डोंगर कापणी केलेली नाही. वीज उपकेंद्र स्व. मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्री असताना उभारण्यात आले होते.

याविषयी आज मंत्रालयात पत्रकारांनी त्यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले, पेडण्यातील जनतेसाठी हे उपकेंद्र उभारले आहे. तो सरकारी प्रकल्प आहे आणि जनहितार्थ उभारण्यात आला आहे. सरकारच्या एका खात्याने दुसऱ्या खात्याला नोटीस बजावली आहे. मी त्याला फार महत्व देत नाही. खात्यांच्या पातळीवर तो विषय हाताळला जाईल.

Mandrem Hill Cutting: 'मांद्रेतील डोंगरकापणी पर्रीकर यांच्या काळातील'; नगर नियोजन खात्याच्या नोटीस ढवळीकर स्पष्टच बोलले
मोठी बातमी! गोवा सरकारकडून मनोहर पर्रीकर युवा शास्त्रज्ञ पुरस्काराची घोषणा, मिळणार पाच लाखांचे बक्षीस

धोकादायक दरडींचा शोध घेणार

तलाठी डोंगर कापणीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देतील आणि भरारी पथक तेथे भेट देऊन डोंगर कापणी बंद पाडेल. त्याशिवाय संबंधितांवर कारवाईही करेल, अशी कारवाईची दिशा या बैठकीत ठरविण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. वायनाडसारखी घटना राज्यात घडू नये, म्हणून उपाययोजना करण्यासाठी धोकादायक दरडींचा शोध घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

Mandrem Hill Cutting: 'मांद्रेतील डोंगरकापणी पर्रीकर यांच्या काळातील'; नगर नियोजन खात्याच्या नोटीस ढवळीकर स्पष्टच बोलले
Sudin Dhavlikar: बार्देश रहिवाश्यांची विजेची समस्या लवकरच संपणार, वीजमंत्र्यांनी दिली 'ही' महत्वाची माहिती

डोंगररक्षण तलाठ्यांकडे

आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीसाठी सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंता तसेच मुख्य वनसंरक्षकांना न बोलाविल्याबद्दल उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना महसूल सचिव संदीप जॅकीस यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 72 तासांत याचा खुलासा जिल्हाधिकाऱ्यांकडून मागवण्यात आला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com