Margaon Dainik Gomantak
गोवा

Margaon: खुल्या जागेत मासेविक्री नको, आरोग्य केंद्राकडून पालिकेला निर्देश; मोकळ्या जागेचा होतोय गैरवापर

Illegal fish sale Fatorda Margao: माडेल-फातोर्डा येथील नागरिकांकडून तसेच सावियो डायस यांच्याकडून तेथे उघड्यावर बेकायदेशीर मासेविक्री होत असल्याची तक्रार करण्यात आली होती.

Sameer Amunekar

मडगाव: माडेल-फातोर्डा येथील नागरिकांकडून तसेच सावियो डायस यांच्याकडून तेथे उघड्यावर बेकायदेशीर मासेविक्री होत असल्याची तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत मडगाव आरोग्य केंद्राने १३ ऑगस्ट रोजी सकाळी सदर स्थळी पाहणी केली होती. त्यावेळी आढळून आलेल्या निरीक्षणांच्या आधारे कारवाई करण्याचे निर्देश मडगाव पालिकेला देण्यात आले आहेत.

या पाहणीत आरोग्य केंद्र पथकाला ४ ते ५ मासे व्यापारी माडेल, फातोर्डा येथील मोकळ्या जागेचा वापर करत असल्याचे आणि सदर प्लॉटमध्ये सुमारे डझनभर मासळी वाहतूक करणारी वाहने पार्क केल्याचे आढळून

आले होते. सध्या सदर केंद्राने डासांची संभाव्य पैदास स्थाने आढळून आलेल्या ठिकाणी अळ्यांविरुद्ध उपाययोजना केल्या आहेत.

सदर ठिकाणी थर्माकोल बॉक्स आणि प्लास्टिक बॉक्स-क्रेट हे मोकळ्या जागेत साठवले वा टाकले जातात. ते डासांच्या पैदाशीचे संभाव्य स्रोत आहेत. त्यामुळे परिसरातील लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. गोवा सार्वजनिक आरोग्य कायद्यानुसार, आणि स्वच्छतेच्या आरोग्य दृष्टिकोनातून हा एक उपद्रव आहे.

फातोर्डातील प्रकरणाची दखल घ्यावी

फातोर्डातील या प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी. संबंधित अधिकाऱ्यांना सदर उपद्रव कमी करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना करण्याचे निर्देश द्यावेत, तसेच कारवाईचा अहवाल तक्रारदाराला पाठवावा, असे मुख्याधिकाऱ्यांना आरोग्य केंद्राकडून पाठविण्यात आलेल्या नोटिशीत स्पष्ट करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain Alert: 'चतुर्थी'काळात पावसाचे संकट! 4 दिवस 'यलो अलर्ट' जारी; जोरदार सरी कोसळण्याची शक्यता

बिहारचे मुद्दे आणि चेहरे; मतदारयादी शुद्धीकरण, व्होट-चोरीचा आरोप आणि लालूंचे 'जंगल राज'

Horoscope: गणपतीच्या आराधनेने होतील अडथळे दूर, तुमच्या राशीनुसार कोणते बदल आवश्यक? जाणून घ्या

Opinion: 'पार्सल संस्कृती'चा गैरवापर; युवा पिढी बर्बाद होण्यास वेळ लागणार नाही

Ganesh Festival In Goa: गोव्यात 1961 नंतर सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात, आज प्रत्येक गल्लीबोळात पाहायला मिळतो बाप्पाचा जल्लोष

SCROLL FOR NEXT