Illegal Construction Canva
गोवा

Margao News: मडगाव न्यू मार्केटमधले बेकायदा प्रकार थांबवा! असोसिएशनकडून चिंता व्यक्त; पालिकेचे दुर्लक्ष

Margao New Market: मडगाव न्यू मार्केट ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष गोपाळ नाईक यांनी न्यू मार्केटमध्ये चालू असलेली बेकायदा बांधकामे तसेच न्यू मार्केटमधील दुकाने बेकायदा परस्पर दुसऱ्यांना विकण्याचे प्रकार वाढले असल्याने त्यांनी चिंता व्यक्त केली.

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: मडगाव न्यू मार्केट ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष गोपाळ नाईक यांनी न्यू मार्केटमध्ये चालू असलेल्या बेकायदा बांधकामांकडे पालिका त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच न्यू मार्केटमधील दुकाने बेकायदा परस्पर दुसऱ्यांना विकण्याचे प्रकार वाढले असल्याने त्यांनी चिंता व्यक्त केली.

गोपाळ नाईक यांनी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसमवेत मुख्य अधिकारी मेल्विन वाझ यांची भेट घेतली असून या बेकायदा बांधकामाबद्दल निवेदन सादर केले आहे. आपण न्यू मार्केटमधील बेकायदा दुरुस्ती, बांधकाम, विक्रीची प्रकरणे पालिकेच्या निदर्शनास आणून दिली. मात्र त्यावर काहीही कारवाई केली जात नाही, असे गोपाळ नाईक यांचे म्हणणे आहे.

हे प्रकार थांबविण्यासाठी पालिकेकडून ठोस पावले उचलणे आवश्यक असल्याचे नाईक सांगतात. जे कोण या बेकायदा बांधकामात गुंतलेले आहेत, त्यांना काहीही विचारल्यास ते शिवीगाळ करतात, उद्धटपणे वागतात, असे त्यांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT