Illegal Construction Dainik Gomantak
गोवा

Panjim Illegal Construction: मळा-पणजीतील सरकारी जागेत बेकायदा बांधकाम

Goa Illegal Construction: महाले यांची तक्रार: पंतप्रधानांसह मुख्यमंत्र्यांकडे पाठवली तक्रार

दैनिक गोमन्तक

Goa Illegal Construction: मळा (पणजी) येथील सरकारी जागेत अतिक्रमण केल्याची लेखी महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे तक्रार येथील रहिवाशी विनायक महाले यांनी केली आहे.

महाले यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आलेक्स फर्नांडिस ही व्यक्ती अमेरिकेत राहत असून, त्याच्या कुटुंबाने बेकायदेशीर बांधकाम केले आहे.

तळमजला आणि पहिल्या मजल्याचे बांधकाम केले आहे. त्याशिवाय पत्र्याचे शेड उभारले आहे. तक्रारदार महाले यांनी तक्रारीच्या प्रती पंतप्रधानांसह मुख्यमंत्री, महसूलमंत्री यांनाही पाठवल्या आहेत.

अवैधरित्या बांधलेले ते शेड नेपाळी आणि बिहारी लोकांना भाड्याने दिले आहे. हे लोक दारू पिऊन वाद घालत असतात. याशिवाय मळा परिसरात मोठ्या प्रमाणात विना वापराचे साहित्य ठेवण्यात आले आहे.

पाऊस पडल्यानंतर दूषित झालेले पाणी मळा तलावात जात आहे. त्याशिवाय सुतारकाम करणारा भाड्याने बेकायदेशीर झोपडीत राहतो.

तो जे काम करीत असतो, त्याचा आपल्या कुटुंबास व शेजाऱ्यांना त्रास होत आला आहे,असेही महाले यांनी तक्रारीत म्हटले आहे.

या तक्रारीच्या प्रती आरोग्य मंत्री, उत्तर गोवा जिल्हाधिकारी, पणजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी, पणजी पोलिस स्थानकाचे निरीक्षक यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

सरकारी जमिनी बळकावल्याची तक्रार

पोर्तुगीज पासपोर्ट असलेल्या पी. फर्नांडिस नामक व्यक्तीचे कुटुंब नुकतेच गोव्यात आले आहे. त्या कुटुंबानेही कोणतीही परवानगी न घेता सरकारी जमिनीवर बेकायदा बांधकाम केले आहे.

याशिवाय सुरज नाईक, कुमार नाईक, रिटा चोडणकर, शोभा चोडणकर-देसाई, रामा सुतार, पेट्रिक डायस, अशोक पाटील, रामचंद्र सुतार या सर्वांनी सरकारी जमिनी बळकावल्या आहेत.

या परिसरात जे सार्वजनिक शौचालय आहे, त्याची स्वच्छता राखली जावी, अशी मागणीही महाले यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

Goa Assembly Session: गोवा विधानसभेचा 'खेळखंडोबा'! सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात राज्याच्या भवितव्याचा विसर

Dabolim Dubai Flight: दाबोळी-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार, दररोज एक उड्डाण; मुंबई-गोवा मार्गावरही दिवसाला 8 फेऱ्या

Goa Tourist Death: आठ महिन्यांत गोव्यात 56 पर्यटकांचा मृत्यू! 4 पर्यटकांचे खून; 14 जणांचा बुडून मृत्यू, तर 10 जणांची आत्महत्या

DJ चा आवाज, लग्नाचा जल्लोष अन् अचानक आगीचे भयानक लोट! रिसेप्शन पार्टीत 22 जणांचा होरपळून मृत्यू, थरकाप उडवणारा Watch Video

SCROLL FOR NEXT